महाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक

महाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक

महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट झालाय. आगीच्या भडक्यात सर्व प्लांट जळून खाक झालाय. प्रिव्ही कंपनीला ही आग लागली आहे.

  • Share this:

महाड,ता.26 एप्रिल: महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट झालाय. आगीच्या भडक्यात सर्व प्लांट जळून खाक झालाय. प्रिव्ही कंपनीला ही आग लागली आहे.

सुरवातीला आगीचं स्वरूप किरकोळ होतं मात्र केमिकल असल्यानं पाहता पाहता आग भडकली आणि सर्व प्लांटच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कंपनीच्या आवारात असलेल्या 25 दुचाकी, कार्स त्याच बरोबर मोठा ट्रेलरही जळून खाक झालाय.

केमिकल कंपनी असल्यानं अग्निशमन दलाला पाणीही टाकता येत नाही. आग ओकणारा सूर्य आणि आगीचा भडका यामुळं कंपनीत लहान मोठे स्फोट होत असून आतलं सर्व केमिकल संपल्याशिवाय आग शांत होणार नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

परफ्युम्स साठी लागणाऱ्या अल्कोहल(सॉलव्हंट) चा साठा या कंपनीत असल्यानं आगीवर नियत्रण मिळवणं कठीण जात आहे. अशावेळी केवळ फोम चा फवारा अग्निशामन दलाकडून मारला जातो. त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवायला अजून काही तास जाणार असून खबरदारी म्हणून रायगड एमआयडीसीचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 03:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading