VIDEO: नवी मुंबईत डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

VIDEO: नवी मुंबईत डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

शॉक सर्किटमुळे थर्माकोलला आग लागली आणि त्याचा भडका उडाला. पण वेळीच अग्निशमन दलाला प्राचारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 18 मार्च : नवी मुंबईच्या डी. वाय पाटील इमारतीला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. आग लागलेली या इमारतीमध्ये मुलींचं हॉस्टेल आहे. ही आग मोठ्या प्रमाणात लागली असली तरी आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्रिशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणी इमारतीत अडकलं आहे का याचा शोध अग्निशमन दलाकडून सुरू आहे. हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीची तिव्रता जास्त होती आणि परिसरात धूर पसरला.

रस्ता ओलांडत होता दुचाकीस्वार, एसटी बसने दिली जोरात धडक, LIVE VIDEO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉक सर्किटमुळे थर्माकोलला आग लागली आणि त्याचा भडका उडाला. पण वेळीच अग्निशमन दलाला प्राचारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. आग विझली असली तरी अद्याप परिसरात धुराचे लोळ आहेत. तर कोणी इमारतीमध्ये आहे का याचाही शोध पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.

अरे देवा! ‘कोरोना’सह आता राज्यात माकड'ताप', दोघांचा मृत्यू

First published: March 18, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या