गांधींच्या हत्येचा तो गुन्हेगार ज्याला गोडसेंसोबत झाली होती फाशी

गांधींच्या हत्येचा तो गुन्हेगार ज्याला गोडसेंसोबत झाली होती फाशी

गांधी हत्याकांडामध्ये फाशीची शिक्षा भोगलेल्या पहिल्या व्यक्तीचं नाव म्हणजे नथुराम गोडसे सगळ्यांना माहित आहेत. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : महात्मा गांधी यांच्या हत्येचा जेव्हाही विषय येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आणि डोळ्यांसमोर एक चेहरा येतो तो म्हणजे नथुराम गोडसे यांचा. परंतु 30 जानेवारी 1948 रोजीची घडलेली घटना सामान्य नव्हती. संध्याकाळी संपूर्ण देश ज्यांना बापू म्हणायचा त्या महात्मा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधींसारख्या व्यक्तीला संपवण्याचे काम एकट्या व्यक्ती करू शकत नाही. गांधी हत्या प्रकरणात एकूण 9 जणांवर कोर्टाने आरोपी केले होते, त्यापैकी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गांधी हत्याकांडामध्ये फाशीची शिक्षा भोगलेल्या पहिल्या व्यक्तीचं नाव म्हणजे नथुराम गोडसे सगळ्यांना माहित आहेत. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यांचं नाव आहे नारायण आपटे. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि गोडसे यांच्याप्रमाणेच त्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरूंगात फाशी देण्यात आली.

आपटेंनी 1939ला हिंदू महासभेत झाले सामील

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण आपटे यांचा जन्म 1911 मध्ये एका अभिजात ब्राह्मण कुटुंबात झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सायन्सची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारची कामे केली. 1932 मध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. आपटे 1939 मध्ये हिंदू महासभेत सामील झाले. 22 जुलै 1944 रोजी पाचगणी येथे त्यांनी महात्मा गांधींच्या विरोधात निदर्शने केली. 1948 मध्ये त्यांनी कट रचून गांधींची हत्या केली.

इतर बातम्या - महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढवय्या हरपल्या, विद्या बाळ यांचं निधन

या कारणामुळे सावरकरांची कोर्टाने केली मुक्तता

गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये 10 फेब्रुवारी 1949च्या दिवशी विशेष न्यायालयाने सजा सुनावली होती. या हत्याकांडामध्ये 9 आरोपींपैकी एकाची न्यायालयाने मुक्तता केली होती. न्यायालयाने विनायक दामोदर सावरकरांची पुराव्यांअभावी मुक्तता केली होती. इतर 8 आरोपींनी गांधींच्या हत्या, हत्येचा कट आणि हिंसाचाराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली होती. 2 आरोपींना म्हणजे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना या प्रकरणात फाशी देण्यात आली होती तर इतर 6 आरोपींना आजीवन कारावास सुनावण्यात आला होता. आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींमध्ये नथुराम गोडसेंचा भाऊ गोपाळ गोडसेदेखील सहभागी आहे.

इतर बातम्या - पाळीव कुत्र्याने चिमुरड्याचा पकडला पाय, जमावाने काठी दगडांने बेदम मारलं पण..

या रात्री झाली होती महात्मा गांधींची हत्या

महात्मा गांधी जेव्हा 30 जानेवारी 1948च्या सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांवर दिल्लीमध्ये स्थित बिडला भवनात सायंकाळची प्रार्थना करण्यासाठी जात असताना सर्वात आधी नथुराम गोडसेंनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर गांधींसोबत असलेल्या महिलेला बाजूला केलं आणि सेमी ऑटोमेटिक पिस्तूलने एकामागोमाग 3 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

इतर बातम्या - भाजपला पडणार मोठं खिंडार, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीने रचला मास्टर प्लान

First published: January 30, 2020, 11:42 AM IST

ताज्या बातम्या