विरोधकांच्या सर्व टीकांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, राज्याचं लक्ष

विरोधकांच्या सर्व टीकांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, राज्याचं लक्ष

बुधवारी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी आपली राज्यपालांच्या अभिभाषणातबद्दलची भूमिका मांडली होती. त्यात हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा टीका देखील करण्यात आल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : आज विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार आहेत. बुधवारी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी आपली राज्यपालांच्या अभिभाषणा बद्दलची भूमिका मांडली होती. त्यात हे सरकार स्थगिती सरकार आहे अशा टीका देखील करण्यात आल्या होत्या. आज या सगळ्या गोष्टींवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

एकीकडे आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल महाविकासआघाडीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची नागपुरात बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही बैठक होईल.

हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर 23 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, कोणतं खातं कोणाकडे जाईल, तसेच आत्ता खातेवाटप जाहीर करण्यात आला आहे. त्यात काही बदल होईल का हे स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक सकाळी नऊ वाजता विधान भवनाच्या परिसरात होणार आहे.

इतर बातम्या - देशाची अर्थव्यवस्था ICUमध्ये, मोदींच्या माजी सल्लागारानेच केली टीका

दुसरीकडे, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे आजही नागपुरात आहेत. खडसे आज नेमकी कोणाची भेट घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. "मी सध्या माझ्या खाजगी आणि विधिमंडळातील काही कामांसाठी आलोय" असे ते म्हणत असले तरीही खडसे हे विविध नेत्यांच्या संपर्कात आहेत. काल देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट होऊ शकली नाही. आज पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

Tags:
First Published: Dec 19, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading