मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजणार? यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजणार? यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

    मुंबई, 17 डिसेंबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सोमवारी सावकरांच्या मुद्द्यावर पहिला दिवस विरोधकांनी गाजवला होता. आज शेतकरी कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील आजच्या ठळक घडामोडींचा आढावा. 1. शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत. देशाच्या मुळावर घाव घातला जात असल्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. 2.दिल्लीतील हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. जामिया विद्यापीठात पोलिसांनी प्रवेश केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सुनावणीकडे सर्वांचं लक्ष 3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. झारखंडच्या सभेत अमित शहांचं आवाहन. राजकीय पक्ष हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा विरोधकांवर आरोप. 4.सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचे नेते घेणार राष्ट्रपतींची भेट. देशभरात उफाळलेल्या हिंसाचार आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी चर्चा होण्याची शक्यता. 5. आता अन्य कुठल्याच पक्षात जाणार नाही, दोन पक्ष बदलले. आता मी आणि माझी दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपातच राहणार, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलंय. सिंधुदुर्गातील सावंतवाडी इथं आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. वाचा-ताटात वाढलं कमी मटण, पतीने मुलांदेखत पत्नीला जाळलं! 6 पोर्तुगीजचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा 19 डिसेंबर पासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर. महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत सहभागी होणार. 7. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्कर प्रमुख असतील असं म्हटलं जात होतं. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. रावत हे 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. 8.'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. यामध्ये रजनीकांत यांचा वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या लूकची तर सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सध्या तुफान चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ते पोलिसाची भूमिका निभावणार आहेत. रजनीकांत यांची दरवेळी प्रमाणे या चित्रपटात धमाकेदार एन्ट्री आणि सुपरकुल लूक असणार याबाबत शंकाच नाही. 9. जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. कोल्हापूरच्या महागाव गावचे जवान शहीद अतिरेक्यांच्या चकमकीत शहीद झाल्याची घटना 16 डिसेंबरला घडली आहे. 10. रेल्वे विभागाने एक अनोखी सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय. रेल्वे आता प्रवाशांना एक खास प्रकारचं पाणी देणार आहे. हे पाणी चक्क हवेपासून तयार होणार असून प्रवाशांना ते स्वस्त दरात देण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशात याचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येत असून यात यश मिळालं तर देशभर हा प्रयोग राबविला जाणार आहे. वाचा-बोईसरमधून 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ajit pawar, Assembly session, BJP, Chagan bhujbal, Congress, Devendra Fadanvis, Jayant patil, Maharashtra, NCP, Uddhav thackeray, Winter assembly session

    पुढील बातम्या