मुंबई, 25 मार्च : राज्यात मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म. तापमानाचा पारा दिवसभर वाढतोय पण त्याचवेळी रात्री वादळीवारासह पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा त्रास आणि दुसरीकडे अचानक आलेला पाऊस यामुळे नागरिकांमची चिंता वाढली आहे.
पुणे शहरात पहाटे साडेतीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेष म्हणजे पुणे वेधशाळेनं कालच पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भल्या पहाटेच पावसाने हजेरीदेखील लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यातच नाहीतर पावसाने सोलापुरातही हजेरी लावली.
सोलापुरात रात्रभर पावसाची रिपरीप सुरू होती. रात्रभर झालेल्या पावसाने सोलापूरकर धास्तावले आहेत. आधीच कोरोना त्यात पावासाने सोलापूरकर चिंतेत आहेत. रात्री 8 वाजल्या पासून सुरू असलेला पाऊस पहाटे 5 वाजता थांबला. तर पाडव्याच्या सणाला सोलापुरात ढगाळ वातावरण आहे.
हे वाचा - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली, एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण
पुढील पाच दिवस पावसाची शक्यता
वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही ही पावसाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याच बरोबर अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे.
मुंबईत काही ठिकाणी 27 आणि 28 तारखेला हलक्या पावसाची शक्यता
कोकणात सहा दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबईत काही ठिकाणी 27 आणि 28 तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात चार-पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर दोन दिवस गारपीटीची शक्यता आहे. विदर्भात 25 ते 28 तारखेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर काही तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे.
हे वाचा - विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी केली केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी, म्हणाले.
जिल्ह्यांतील बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज
दरम्यान, गेल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांत गारपीटसह वादळी पाऊस झाला होता. परंतु आता पुन्हा राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचं सावट पसरलं आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांसह पुणे विभागातील काही भागांत मंगळवारी (24 मार्च) दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर 25 मार्चला जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत; तर नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
हे वाचा - काबुलच्या गुरुद्वारामध्ये आत्मघातकी हल्ला, 4 जणांचा मृत्यू
28 आणि 29 तारखेला या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
याचबरोबर 26 तारखेला प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नाशिक जिल्हा, खान्देश आणि मराठवाड्यातील उत्तरेकडे असलेल्या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. 27 तारखेला पावसाचे क्षेत्र कमी होईल; परंतु, 28 आणि 29 तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उल्लेख केलेल्या भागांमध्ये 25 ते 29 मार्च दरम्यान काही प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज आहे, आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचा -
...तर घरात बसून हजारो लोकं आत्महत्या करतील, ट्रम्प यांचे अजब वक्तव्य मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.