Home /News /news /

Weather Alert: राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Weather Alert: राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

3 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर राहणार कायम, हवामान खात्याचा इशारा

मुंबई, 31 ऑगस्ट : गेल्या 3 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरिकांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आजही राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. खरंतर आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात अशा आसमानी संकटामुळे संसर्गाचा धोका तर आहेच पण विदर्भात आलेल्या पुरामुळे अनेकांची संसार पाण्याखाली गेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आज पुढील 24 तासांत काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पालघर, ठाणे, नाशिक, नगर मधील काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात काही भागात पावसाचा जोर आज ही राहील असा अंदाज आहे. तर मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू असणारआहे. त्यामुळे काल थोड्या प्रमाणात पाऊस ओसरला असला तरी आज पावसाची बॅटिंग सुरूच राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 'मंदिरं उघडण्यासाठी भाजपने केलेलं आंदोलन नक्की धार्मिक होतं की राजकीय?' याच पार्श्वभूमीवर अनेक गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नदी आणि धरणालगतच्या गावांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. आज फक्त राज्यातच नाही तर मध्य प्रदेशात तसंच गुजरात किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. केतन किनारपट्टी तसंच घाटमाथ्यावर काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. महाराष्ट्रातील या गावांना बसला पुराचा सर्वाधिक फटका दरम्यान, गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगाव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची रविवारी पाहणी केली. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. PHOTOS: जावयाने सासरच्या 4 जणांची हत्या करून पुरलं, दीड वर्षानी जमीन उकरली आणि.. पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिपळगाव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. लाडज गावातून 72 तर बेलगांव येथून जवळपास 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य बोटीद्वारे बचाव पथक सतत करीत आहे. सावली तालुक्यातील बेलगाव, निमगाव आदी गावांत पुराचा फटका बसला आहे. तसेच पोंभूर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी परिसरात असणारे गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या