Weather Alert: पुढच्या 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert: पुढच्या 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका आहेच तर दुसरीकडे मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर पश्चिम उपनगरात भाईंदर आणि मीरा रोड भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण आता पुढच्या 24 तासांत मुंबई आणि शहरालगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत मराठा समाज आक्रमक, थेट प्लामा थिएटरबाहेर करणार ठिय्या आंदोलन

सोमवारी मंगळवारी मुंबई ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड इथे मेघगर्जनेसह पुढच्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस होईल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. राज्यातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

एका दिवसात समोर आले 92 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांचा आकडाही हजाराच्या वर

जोरदार पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. काही भागात तर काही तासांमध्येच प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. तर गडचिरोलीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यती व्यक्त केली जात आहे.

देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद

दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावरील बटाटा पावसाच्या पाण्यात भुईसापट झाला आहे. या भागातले पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे बटाटा हे एकमेव मुख्य नगदी पीक आहे. बटाटा काढणीच्या अंतीम टप्प्यात असताना परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून रोज संध्याकाळी पडणा-या मुसळधार पावसामुळे उरले सुरले पीक सुद्धा भुईसपाट झाले आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading