राधाकृष्ण विखे-पाटलांचा 'भाजप'प्रवेश निश्चित; 'या' काँग्रेस आमदारांसह खबलतं सुरू

Maharashtra Vidhan Sabha election : राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 12:36 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटलांचा 'भाजप'प्रवेश निश्चित; 'या' काँग्रेस आमदारांसह खबलतं सुरू

मुंबई, सागर कुलकर्णी, 04 जून : काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित झाला आहे. भाजप प्रवेशापूर्वी राधाकृष्ण विखे – पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसचे आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह ही खलबतं सुरू आहेत. भाजप प्रवेश करण्यापूर्वी विखे – पाटील काही काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधत आहेत. शिवाय, राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह किती आमदार भाजप भाजप प्रवेश करणार? हे देखील पाहावं लागणार आहे.

राधाकृष्ण विखे - पाटील हे आपल्या आमदारकीचा आज राजीनामा देण्याची देखील शक्यत आहे. विधीमंडळात जाऊन विखे - पाटील राजीनामा देणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.


विधानसभेच्या तोंडावर BJPची नवी रणनीती, पवारांचा कट्टर विरोधक पुण्याच्या पालकमंत्रिपदी?

पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी विखेंवर ?

Loading...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होम टाऊनमध्ये शह देण्यासाठी आता भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. कारण, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल भाजपनं सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय, त्यांनी आघाडीच्या प्रचाराला जाणं देखील टाळलं. तर, त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे – पाटील यांनी कमळाला हात देत भाजपच्या तिकीटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे – पाटील यांनी विजय देखील मिळवला. हा विजय आपण आजोबांना अर्पण करत असल्याचं म्हणत त्यांन शरद पवारांना टोला हाणला. त्यानंतर भाजप आणखी एक धक्का शरद पवार यांना देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.


SPECIAL REPORT: हिंदी भाषेच्या सक्तीवरून सरकारचा यूटर्न?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...