'त्या' तीन दिवसात काहीही गडबड होऊ शकते; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

'त्या' तीन दिवसात काहीही गडबड होऊ शकते; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीतील त्या तीन दिवसांवर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.

  • Share this:

इचलकरंजी, 23 सप्टेंबर: केंद्रीय निवडणू्क आयोगाने राज्यातील 288 जागांवर निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यात 21 ऑक्टोबर मतदान तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यात तीन दिवसाचे अंतर आहे, यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे याचे आम्ही स्वागतच करतो. पण मतदान आणि मतमोजणी यांच्यात तीन दिवशांचे अंतर आहे. या तीन दिवसात काहीही गडबड केली जाऊ शकते. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी करण्याची मागणी करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

राजू शेट्टींना स्थान नाही

वंचित आघाडी म्हणजे भाजपची बी-टीम असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपाचा आंबेडकरांनी समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा आरोप म्हणजे चोराच्या उटल्या बोंबा आहेत. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसचे बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना कोणतेही स्थान असणार नसल्याचे तसेच अन्य अपक्ष उमेदवारांना देखील पाठिंबा असणार नसल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.पण मित्रपक्षांसाठी आम्ही आवश्यक त्या ठिकाणी जागा सोडू असे ते म्हणाले.

बंद खोलीत झाली चर्चा

प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत 20 मिनिटे चर्चा झाली. दोघांच्या भेटीतील तपशील जाहीर झाला नसला तरी राजकीय स्थितीबद्दल औपचारिक चर्चा झाल्याचे आवाडे यांनी सांगितले.

जनता सरकारला वैतागली

सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राज्यातील जुमलेबाज सरकारला जनता वैतागली आहे. आम्ही तिसरा आणि चागंला पर्याय म्हणून जनतेसमोर आलो आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 08:29 AM IST

ताज्या बातम्या