पुढचे 4 दिवस धोक्याचे, या शहरांमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढणार

पुढचे 4 दिवस धोक्याचे, या शहरांमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढणार

येत्या 23 ते 24 तारखेपर्यंत पुणे, नाशिक आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 21 मे : 18 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पहिल्या पावसाची आतूरतेने वाट पाहणारे नागरिक सध्या उन्हाच्या जळ्यांनी मात्र हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, अहमदनगर, नाशिक सारख्या शहरांमध्ये तर आंध्र प्रदेश, हैद्राबाद, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

काही ठिकाणी उन्हाचा पारा 45 अंश सेल्शिअसच्यावर गेला आहे. त्यामुळे नागरिक गरमीमध्ये वैतागले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये उष्मघाताने नागरिकांनी जीव गमावला आहे. जीव नकोसा करणारा हा उन्हाळा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे घामाने अंगाची आणखी लाही-लाही होणार आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 23 ते 24 तारखेपर्यंत उन्हाचा पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला. येत्या 23 ते 24 तारखेपर्यंत पुणे, नाशिक आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मंगळवार पासून ते शुक्रवारपर्यंत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्णतेचा लाट वाढणार आहे. उत्तर दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा सट्टा बाजार बंद; जाणून घ्या कारण

सोमवारी राज्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये 43.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर याचवेळी मुंबईमध्ये 34.8 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

उन्हाच्या जळ्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी थंड पेय पिणं.

जगातील सर्वात उष्ण शहरात विदर्भातील सहा शहरे...

1) अकोला – 2

2) ब्रम्हपुरी – 3

3) वर्धा – 5

4) चंद्रपूर - 6

5) अमरावती - 7

6) नागपूर - 8

कुठे होणार सगळ्यात कमी पाऊस

- स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी बंगाल, बिहार, झारखंडमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे.

- भारतामध्ये पूर्वेला 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मध्य भारतात मान्सून 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो.

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

First published: May 21, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading