Home /News /news /

महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांना जाणारा ऑक्सिजन थांबवला, MPमध्ये ओढावली भयावह परिस्थिती

महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांना जाणारा ऑक्सिजन थांबवला, MPमध्ये ओढावली भयावह परिस्थिती

देशातला कोरोनामुक्तीचा दर 90 टक्के असून मृत्यचं प्रमाण हे 1.51 एवढं झालं आहे.

देशातला कोरोनामुक्तीचा दर 90 टक्के असून मृत्यचं प्रमाण हे 1.51 एवढं झालं आहे.

महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील वनस्पतीमध्ये ऑक्सिजनचं उत्पादन घेतल्यानंतर इतर राज्यात पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : राज्यात आधीच कोरोनामुळे (Corona) हाहाकार सुरू आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे कोरोनाचा धोका आणखीनच वाढला आहे. अशात प्रत्येक राज्य हे ऑक्सिजनसाठी (Oxygen) झगडत आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील वनस्पतीमध्ये ऑक्सिजनचं उत्पादन घेतल्यानंतर इतर राज्यात पुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) कोरोना संकटात आता अपूरा ऑक्सिजन हे नवं संकट उद्भवलं आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह प्रकरणात वाढ होत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील झपाट्याने वाढली आहे. देवास, जबलपूर, ग्वालियर, शिवपुरी यासह अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या असल्याची माहिती समोर येत आहे. अशात महाराष्ट्रातून पुरवला जाणारा ऑक्सिजन बंद झाल्यामुळे मध्य प्रदेशात धोका आणखी वाढला आहे. 'सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी...' इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया मध्य प्रदेशात राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांत महाराष्ट्रातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. पण महाराष्ट्रातून पुरवठा बंद झाल्यामुळे आता कठीण परिस्थिती राज्यावर ओढावली आहे. मध्य प्रदेश सरकार यासंबंधी महाराष्ट्र सरकारशी बोलत असून ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने नोडल अधिकारी म्हणून आयएएस धनराजू एस यांची नियुक्ती केली आहे. अशात इतर सर्व उद्योगांना ऑक्सिजनचा वापर कमी करावा आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी जास्त प्रमाणात वापरावा अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट दररोज 90 टन ऑक्सिजनची मागणी मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये दररोज 90 टन ऑक्सिजनची मागणी होत होती, पण आता ती झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी ही सरकारसाठी एक मोठी समस्या आहे. सध्या मध्य प्रदेशात ऑक्सिजनची मागणी छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रातून पूर्ण केली जात आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने आता ऑक्सिजनचे मोठं संकट उभं ठाकलं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Lockdown

    पुढील बातम्या