SPECIAL REPORT : शरद पवारांनी विखेंनाही दाखवले आस्मान, होमग्राऊंडमध्ये दाखवले दिवसा तारे!

SPECIAL REPORT : शरद पवारांनी विखेंनाही दाखवले आस्मान, होमग्राऊंडमध्ये दाखवले दिवसा तारे!

लोकसभा निवडणुकीत भाजपनं नगरची जागा मोठ्या फरकानं जिंकली. सुजय विखे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या आशा वाढल्या.

  • Share this:

अहमदनगर, 25 ऑक्टोबर : नगर जिल्ह्यानं आघाडीला चांगली साथ दिली. 12 विरूद्ध 0 अशा फरकानं जागा जिंकू असा दावा करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना जिल्ह्यातल्या मतदारांनी चांगलाच दणका दिला.

लोकसभा निवडणुकीत भाजपनं नगरची जागा मोठ्या फरकानं जिंकली. सुजय विखे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या आशा वाढल्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सर्वच जागा जिंकू असा दावा केला. 12 विरूद्ध 0 अशा फरकारनं निकाल लागेल असा आत्मविश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व चित्रच पालटलं.

आघाडीनं तब्बल नऊ जागा जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या. भाजपनं शिर्डी, शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदा मतदारसंघात विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघात विजय मिळवला. काँग्रेसनं संगमनेर आणि श्रीरामपूर मतदारसंघात विजय मिळवला. तर नेवासे मतदार क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे शंकर गडाख विजयी झाले. गडाखांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पुरस्कृत केलं होतं.

नगर जिल्ह्यावर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलंय. मागील पाच वर्षात भाजपनं इथं ताकद निर्माण केली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत रोहित पवार यांनी जिल्ह्यात नवं राजकीय समीकरण निर्माण केलंय.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 08:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading