VIDEO : सत्तेत की विरोधात? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

VIDEO : सत्तेत की विरोधात? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागमध्ये ही भेट झाली.

  • Share this:

बारामती, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचं जमनत दिलंय, त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागमध्ये ही भेट झाली. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित होते.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेनं आम्हाला विरोधात बसवलंय. त्यामुळे सत्तास्थापनेत भाग घेण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही जनतेनं जो कौल दिला आहे. तो आम्हाला मान्य आहे. कुणाकडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही. जर त्यांनी कुठला प्रस्ताव दिला तर दिल्ली हायकमांड याबद्दल निर्णय घेईल, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading