'मत का द्यायचे' पुणेरी बॅनर आमदाराला झोंबले, लोकांना केली मारहाण?

'मत का द्यायचे' पुणेरी बॅनर आमदाराला झोंबले, लोकांना केली मारहाण?

लाखो रुपये टँकर्ससाठी खर्च करावे लागत असतील तर मतदान का करावं, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 15 ऑक्टोबर : पुण्यात वडगावशेरी भागात नागरिकांनी लावलेले 'नो वॉटर व्हाय व्होट' बॅनर्स आमदाराच्या समर्थकांनी फाडून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. लाखो रुपये टँकर्ससाठी खर्च करावे लागत असतील तर मतदान का करावं, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

अलिशान सोसायटीत वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांवर 'नो वॉटर, व्हाय व्होट?' असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. 24 तास टँकर सुरू असणाऱ्या या सोसायटीमधल्या रहिवाशांना 'नो वॉटर व्हाय व्होट ?' हा प्रश्न सुद्धा विचारण्याची सोय नाही. कारण, आमदाराच्या समर्थकांनी बॅनर्स फाडून सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. लाखो रुपये खर्च केल्यानंतर पाण्यासाठी पुन्हा जास्त पैसे खर्च करावे लागत असतील तर मतदान का करावं, असा रोखठोक सवाल रहिवाशांनी उपस्थित केलाय.

ब्रम्हा सनसिटीतल्या रहिवाशांनी ठराव करून 'नो वॉटर व्हाय व्होट ?' ही भूमिका घेतली. मात्र, मागील पाच वर्षात टँकरची संख्या 75 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा आमदारांनी केला. पुढील वर्षापर्यंत भामा आसखेड धरणाचं पाणी पुण्यात आणून हा प्रश्न निकाला काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच मारहाण केल्याचा आरोपही आमदार जगदीश मुळीक यांनी फेटाळला.

राष्ट्रवादीचे बापू पठारे आमदार होते. तेव्हाही आणि आता भाजपचे जगदीश मुळीक आमदार असताना वडगाव शेरी भागात टँकर माफियांचं साम्राज्य आहे, ही बाब लपून राहिलेली नाही.

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 11:03 PM IST

ताज्या बातम्या