राष्ट्रवादीची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, रोहित पवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी!

राष्ट्रवादीची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, रोहित पवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी!

विधानसभा निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 77 उमेदवारांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 77 उमेदवारांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. या यादीत रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे -पाटील, संग्राम जगताप, संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीची घोषणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघडी जागावाटप अखेर निश्चित झालं असून महाआघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. यावेळी नुकताच काडीमोड घेतलेल्या समाजवादी पक्षाचं मन वळवण्यातही काँग्रेसला यश आलंय. आजच्या पत्रकार परिशदेत दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 130 जागा लढवणार आहे.

महाआघाडीकडून मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यापैकी शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीला ३ जागा देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीची यादी जाहीर

अजित पवार - बारामती

श्रीवर्धन - आदिती तटकरे

दिंडोशी - विद्या चव्हाण

सिन्नर - माणिकराव कोकाटे

कर्जत-जामखेड - रोहित पवार

नगर - संग्राम जगताप

येवला - छगन भुजबळ

इंदापूर - दत्तात्रय भरणे

माजलगाव - प्रकाश सोळंके

बीड - संदीप क्षीरसागर

परळी - धनंजय मुंडे

मुरबाड - प्रमोद हिंदुराव

हडपसर - चेतन तुपे

दौंड - रमेश थोरात

अणुशक्तीनगर - नवाब मलिक

गुहागर - सहदेव बेटकर

सातारा - दीपक पवार

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील

फलटण - दीपक चव्हाण

पंढरपूर - भारत भालके

चिपळूण - शेखर निकम

केज - पृथ्वीराज साठे

जिंतूर - विजय भांबळे

घनसावंगी - राजेश टोपे

कागल - हसन मुश्रीफ

कोरेगाव - शशिकांत शिंदे

मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड

आंबेगाव - दिलीप वळसे

शेवगाव - प्रताप ढाकणे

तासगाव - सुमन पाटील

गेवराई - विजयसिंह पंडित

परांडा - राहुल मोटे

========================

========================

========================

========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 10:48 PM IST

ताज्या बातम्या