कोकणातील पहिला विजय, नितेश राणेंची कणकवली-देवगड मतदारसंघात बाजी

कणकवली-देवगड मतदारसंघात भाजपची सरशी, शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांना धूळ चारत नितेश राणेंनी गुलाल उधळला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 11:53 AM IST

कोकणातील पहिला विजय, नितेश राणेंची कणकवली-देवगड मतदारसंघात बाजी

कणकवली, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. कणकवली-वैभववाडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार सतीश सावंत अशी चुरशीची लढत आहे. मात्र जनतेनं नितेश राणेंना मोठा कौल दिल्याचं पाहायला मिळत आहे.कणकवली-देवगड मतदारसंघात पुन्हा एकदा नितेश राणे बहुमतानं विजयी झाले आहेत. विधानसभेची मतमोजणी पूर्ण होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. नितेश राणे यांनी बहुमताने आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. उद्धव ठाकरे देखील सभेसाठी आले होते.

2014च्या विधानसभा निवडणुकीत कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघात नितेश राणेंना 74,715 मतं मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार प्रमोद जठार यांना त्यावेळी 48,736 मतं मिळाली होती. 2019 च्या विधानसभेतही नितेश राणे आघाडीवर असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांना धूळ चारत नितेश राणेंनी गुलाल उधळला आहे.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

Loading...

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...