मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO: ST चालकाचं जीवघेणं धाडस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत ओसंडून वाहणारी नदी केली पार

VIDEO: ST चालकाचं जीवघेणं धाडस, प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत ओसंडून वाहणारी नदी केली पार

Raigad ST in Flood: रायगडमधील एसटीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एक एसटी नदीवरुन वाहत असलेल्या पुराच्या पाण्यातून चालक नेताना दिसत आहे.

रायगड, 13 जुलै: रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्गात (Sindhudurg) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून (river overflow) वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल (ST bus in flood, video viral) झाला आहे. ज्यामध्ये नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून एसटी चालकाने (ST driver) गाडी नेली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने केलेल्या या धाडसामुळे जोरदार टीका होत आहे.

महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्तावर नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात एसटी नेण्याचा प्रकार समोर आला आहे. नदीच्या पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असताना एसटी चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून भलतयं धाडस दाखवलं.

कडक सॅल्यूट! छातीभर पाण्यात उतरून महावितरण कर्मचाऱ्याचे कार्य; धाडसाचं सर्वत्र कौतुक, पाहा VIDEO

रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी बंधारा उलटून पाणी ओसंडून वाहत होते. या पाण्यात खाडीपट्टयात जाणारा रस्ता ही बुडाला. यावेळी एसटी चालकाने प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता भलतचं धाडस केलं आणि एसटी थेट ओसंडून वाहणाऱ्या पुलावरुन नेली.

रायगडमध्ये मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. कालपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे आणि नद्या नाले भरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा अशाही नागरिकांना सांगण्यात आलं आहे. कालपासून जनजीवन विस्कळीत झाली आहे. आता पावसाचा जोर कमी झाला आहे.

First published:

Tags: Raigad, Shocking news