Home /News /news /

कारगिल विजय दिवशीच महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, काश्मीर खोऱ्यात गमावला प्राण

कारगिल विजय दिवशीच महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, काश्मीर खोऱ्यात गमावला प्राण

सेवा बजावत असताना छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

सोलापूर, 26 जुलै : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती इथल्या जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे (वय 34) यांना वीरमरण आले. सेवा बजावत असताना छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा म्हेत्रे (वय 34) हे शनिवारी रात्री जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले असल्याने सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून कोरोना तपासणीनंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी हुलजंती गावात सोमवारी येण्याची शक्यता आहे. राज्यात या जिल्ह्यातलं लॉकडाऊन आज रात्रीपासून उठणार, पालकमंत्र्यांची माहिती बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाच्या संकटात नवाब मलिकांनी दिली माहिती नागप्पा म्हेत्रे हे 2011 मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेली दहा वर्षे ते सैन्यात सेवा बजावत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हुलजंती येथे झाले होते तर महाविद्यालयीन शिक्षण बालाजीनगर आश्रम शाळेत झाले आहे ते मोठ्या कष्टाने सैन्यदलात भरती झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई दोन भाऊ तीन बहिणी पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार आहे. कोरोनात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, लेकीला संपवून दांपत्याची आत्महत्या गावातील मित्र परिवार आणि गावकरी सोबत त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता संपूर्ण गावात वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली असून त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या