शिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती

भाजपने टाळीसाठी कितीही हात पुढे केला तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी करायची नाही आणि आणि भाजपला सत्ताही मिळू द्यायची नाही असे डावपेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2018 06:36 PM IST

शिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती

संदिप सोनवलकर,मुंबई,ता.31 जुलै : महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सहभागी असला तरी सेनेचे भाजपसोबतचे संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. भाजपने टाळीसाठी कितीही हात पुढे केला तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी करायची नाही आणि आणि भाजपला सत्ताही मिळू द्यायची नाही असे डावपेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. या आधीच भाजपने शतप्रतिशतचा तर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे दोनही पक्ष आपल्या विस्ताराचा जोमानं प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून चर्चा करत आहे. या सर्व आमदारांना स्वबळावर तयारी करण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे अशीही माहिती आहे. एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीत भाजप सत्तेत नको अशी शिवसेनेची आर पार ची भूमिका आहे. राज्यातल्या एकूण 288 मतदारसंघापैकी मोजक्या 120 जागांवर शिवसेना आपली सर्व शक्ती पणाला लावणार असून त्यातल्या 70 ते 75 जागा हमखास निवडून आणण्याचं उद्दीष्ट शिवसेनेने ठेवलं आहे.

चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर

चाकणच्या हिंसक आंदोलनात झालं 8 कोटी रुपयांचं नुकसान!

भाजप आणि शिवसेनेची गेल्या तीन दशकांपासून युती आहे. 2014 पर्यंत राज्यात शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून मान होता. मात्र 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि भाजप हा मोठा भाऊ झाला. याची सल शिवसेनेला आहे. त्यातच शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या मुंबई आणि ठाण्यातही भाजपनं आघाडी घेतली. या विभागातल्या 36 मधून 15 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला घाम फुटलाय. मुंबई महापालिकेतही भाजपने मुसंडी मारलीय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक जिंकून आले. त्यामुळे भविष्यातला धोका ओळखून शिवसेनेने भाजप नकोच अशी भूमिका घेतली आहे.

2014 सारखी परिस्थिती आता राहीली नाही याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळे आगामी निवडणूका शिवसेनेसोबत लढण्याची इच्छा भाजपने अनेकदा व्यक्त केलीय. मात्र झालं तेवढं पुरे आता स्वबळावरच लढणार ही शिवसेनेची भूमिका आहे.

VIDEO : दूषित पाणीपूरवठा केल्यामुळे उप-अभियंत्याला घातला तृतीय पंथीयाच्या हस्ते हार

..आणि चाहत्यांनी रफींच्या कबरेवरची माती नेली

शिवसेनेच्या व्ह्युरचनेत आता उद्धव ठाकरे आदित्यलाही सहभागी करून घेत आहेत. डिसेंबरपर्यंत शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यानंतर जो मान उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे तो नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून दिला गेला नाही यामुळेही उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत.

2009 पर्यंत राज्यात शिवसेना 288 पैकी 171 तर भाजप 117 जागा लढत असे. मोदी लाट आल्यानंतर भाजपने राज्यात 122 जागा पटकवल्या होत्या. अशीच परिस्थिती राहिली तर जनधार कमी होण्याची शक्यता शिवसेनेला आहे. अमित शहांसोबतच्या चर्चेनंतरही शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता त्यापासून दूर हटण्याचा प्रश्नच नाही असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी न्यूज18 इंडियाशी बोलताना स्पष्ट केलं.

आता तुमचं घरच तुम्हाला देईल पेन्शन, अनेक बँकांनी सुरू केली स्कीम

#बाप्पामोरया ! अंगारकी चतुर्थीला अशी सजली गणपती मंदिरं

गरज पडली तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. भाजप विरोधात राष्ट्रीय पातळीवर तयार होत असलेल्या महाआघाडीत शिवेसेनेलाही घेण्याचे प्रयत्न सुरू असून मात्र अद्याप शिवसेना त्यात थेट सहभागी झाली नाही. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घटना घडण्याची शक्यता आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2018 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close