राणेंच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, शिवसेनेच्या खासदाराचा सणसणीत टोला

राणेंच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, शिवसेनेच्या खासदाराचा सणसणीत टोला

सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीसाठी नारायण राणे मैदानात उतरले होते

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचं सरकार स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात एकच जल्लोषाचं वातावरण आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना सणसणीत टोला लगावला.

विनायक राऊत यांनी टीव्ट करून राणे यांच्यावर टीका केली आहे. राऊत आपल्या टीव्टमध्ये म्हणाले की, 'अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले !!  आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे..' असा टोला लगावला आहे.

विशेष म्हणजे, सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीसाठी नारायण राणे मैदानात उतरले होते. बाजारात अनेक आमदार विक्रीसाठी तयार आहे, असं म्हणत राणेंनी घोडेबाजाराचे संकेत दिले होते.

दरम्यान, सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागणारच होता. युतीमध्ये असताना माझ्यासोबत एकेकाळचे सहकारी होते. ते खालच्या थराला जाऊन टीका करत होते. ते अशोभनीय आहे. राजकारणात पडद्यामागे बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या. पण भाजपच्या काही नेत्यांना असं वाटतंय की, आम्हीच काय ते राजकारण करू शकतो. मग काय आम्ही इथं गोट्या खेळायला बसलो नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर पलटवार केला.

'भाजपने अत्यंत बेईमान पद्धतीने येऊन सरकार स्थापन केलं. शिवसेनेला फसवलं ती पहिली बेईमानी. दुसरा गुन्हा बहुमत नसताना काळोखात जाऊन सरकार स्थापन केलं.

आणि तिसरा अपराध कालपर्यंत त्यांनी आमच्याकडे बहुमत आहे असं सांगत होते. यासाठी चौकडी नेमली होती. त्यांची वक्तव्य पाहिलं तर जणू महाराष्ट्र विकायला काढला होता. केंद्रातून थैल्या भरून पैसे दिले जात होते. पण आता याचा फुगा फुटला आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

चाणक्य कोण आहे कळलं का?

तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकाआघाडीची पुढच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली. ज्या पद्धतीने आम्हीच सत्तेत राहु, कोणतेही नियम माणणार नाही.  कुठल्याही पद्धतीत आम्ही सत्तेत राहू अशी वागणूक भाजपची होती. पण हा गोवा-मनिपूर नाही, हा महाराष्ट्र आहे इथं हे चालणार नाही. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.  महाराष्ट्राने भाजपचा अहंकार संपवला आहे, अशी टीका मलिक यांनी केली. तसंच भाजपचे नेते अहंकारी झाले होते. त्यांचा अहंकार हा महाराष्ट्राने संपवला आहे.  कुणी तरी स्वत:ला चाणक्य म्हणून समजून घेत होते. आता या महाराष्ट्राच्या चाणक्याने (शरद पवार) चाणक्य कोण असतं हे चांगल्याचं पद्धतीने सांगितलं आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

'भाजप तोंडघशी पडलं'

सु्प्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर भाजपकडे बहुमत नाही हे स्पष्ट झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच भाजपने प्रयत्न केला होता. पण बहुमत नसल्यामुळे भाजप तोंडघशी पडलं आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे भाजपला इन कॅमेऱ्यात बहुमत सिद्ध करणे अशक्य होतं. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिला. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे, असंही मलिक म्हणाले.

=================

 

First published: November 26, 2019, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading