राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होतीा. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खात्याची फेररचना केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अजित पवार कोरोनामुळे क्वारंटाईन झाल्यानं त्याचा परिणाम राज्य सरकारच्या कामगिरीवर होणार आहे.काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Corona