होय, आमचे महाराष्ट्राचे पोलीस! भरपावसात ड्युटी ऑन 24 तास, हा VIDEO पाहाच

होय, आमचे महाराष्ट्राचे पोलीस! भरपावसात ड्युटी ऑन 24 तास, हा VIDEO पाहाच

रविवारी रात्री अचानक आलेल्या पावसात सुद्धा पोलिसांचे हे काम सुरूच होते.

  • Share this:

टेंभुर्णी, 11 मे : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. अशा या बिकट परिस्थितीत भरपावसात कर्तृव्य बजावणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातंर्गत प्रवास करणाऱ्यांना लवकर घरी जाता यावे यासाठी वाहनांची भर पावसात पोलीस तपासणी करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडताना आपण पावसात भिजतोय, याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष करत आपलं काम सुरूच ठेवले आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सोलापूर आणि पुणे जिल्हा हद्दीवर भीमानगर येथे पोलिसांची चेक पोस्ट आहे. पुणे जिल्ह्यातून येणारी आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणारी वाहने तपासून, त्यांच्याकडे असलेली प्रवास करण्याची  कागदपत्रे तपासणी काम पोलीस करत आहेत. रविवारी रात्री अचानक आलेल्या पावसात सुद्धा पोलिसांचे हे काम सुरूच होते. पाऊस पडतोय तरी वाहने-येणे जाणे सुरूच होती.

वाहनांची रांग लागू नये, यासाठी भर पावसात सुद्धा पोलीस वाहनांची तपासणी करून ती पुढे सोडली जात होती. हे काम करताना काही पोलिसांनी छत्री घेऊन हे काम करत होते. तर काही पोलीस हे पावसात भिजत होते.

हेही वाचा -VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची 'सिंघम' गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस बजावत असलेले काम कर्तव्यापेक्षाही मोठ आहे. याची प्रचिती या व्हिडिओतून पुढे आली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 11, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading