LIVE NOW

LIVE: अलविदा 2020, नववर्षांचं जल्लोषात स्वागत

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | January 1, 2021, 12:06 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated January 1, 2021
auto-refresh

Highlights

11:48 pm (IST)

विरोधी पक्षनेते विरोधातच बोलणार, अनिल देशमुखांचा टोला

11:48 pm (IST)

महिला अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, शक्ती कायदा मार्चमध्ये येणार, दोषींवर कठोर कारवाई होणार -अनिल देशमुख

11:48 pm (IST)

पुणे - नव्या वर्षाचं स्वागत साधेपणानं करा, सरत्या वर्षावर कोरोनाचं मळभ होतं, आगामी वर्ष आशादायी असणार, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून नववर्षाच्या शुभेच्छा

10:01 pm (IST)

कोरोना लसीकरणाचा 'ड्राय रन' देशभर 2 जानेवारीला होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या 4 जिल्ह्यांची निवड -आरोग्यमंत्री राजेश टोपे

9:51 pm (IST)

मुख्यमंत्र्यांकडून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा
येणारं वर्ष आरोग्यदायी करा -उद्धव ठाकरे
स्वयंशिस्तीचा निर्धार करा, मुख्यमंत्र्यांचा संदेश

7:52 pm (IST)

पंढरपूर - रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटींची अफरातफर, तत्कालीन शाखा व्यवस्थापक, कॅशिअरविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात बॅंकेकडून गुन्हा दाखल, 2016 ते 2020 दरम्यान अफरातफर

7:43 pm (IST)

सातारा - महाबळेश्वरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला पसरणी घाटात अपघात, 5 जण गंभीर जखमी, डोंगराच्या बाजूला असलेल्या चरीत चाक गेल्यानं दुर्घटना

7:35 pm (IST)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहपरिवार साईदरबारी, यावर्षी साईबाबांची कृपा होवो, वर्ष जसं संपलंय तसं कोरोना संकट टळो, अर्थव्यवस्था मजबूत होवो, सगळे निरोगी आणि समाधानी राहोत, मध्य प्रदेश आणि देशाच्या जनतेला शिवराज चौहानांकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
6:59 pm (IST)

मुंबईतील गेटवेचा परिसर केला निर्मनुष्य, पोलिसांनी पर्यटकांना काढलं बाहेर, समुद्रकिनारे रात्री 11 नंतर निर्मनुष्य करणार -पोलीस

6:45 pm (IST)

उपमुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा, नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद मिळो -अजित पवार

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स