LIVE NOW

LIVE : नागपूरला पुराचा मोठा फटका, तब्बल 1 हजार नागरिकांचं स्थलांतर

देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील घडामोडींचा आढावा.

Lokmat.news18.com | August 30, 2020, 7:35 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 30, 2020
auto-refresh

Highlights

7:35 pm (IST)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण
सलग तिसऱ्या दिवशी झाली रियाची सीबीआय चौकशी
सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची सलग 8 तास चौकशी
रिया चक्रवर्तीची आजची सीबीआय चौकशी संपली
रिया चक्रवर्ती DRDO गेस्ट हाऊसमधून बाहेर
रिया आणि शोविक पोलीस संरक्षणात घराच्या दिशेनं

7:10 pm (IST)

सुशांतसिंह प्रकरणात अतुल भातखळकरांचं अमित शाहांना पत्र
'बॉलिवूड, ड्रग्ज, राजकारणी संबंध दडपण्याचा कुणाचा प्रयत्न?'
'राज्याच्या गृह विभागातील कोणत्या शक्तींनी प्रयत्न केले?'
सूचना देणारा 'तो' मंत्री कोण? अतुल भातखळकरांचा सवाल
या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करा -अतुल भातखळकर

6:07 pm (IST)

मुंबई - 7 ते 8 महिला पोलीस DRDO गेस्ट हाऊसमध्ये
DRDO गेस्ट हाऊसबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला
रिया चक्रवर्तीनं पोलिसांकडे मागितली होती सुरक्षा
रिया चक्रवर्तीची आजची सीबीआय चौकशी पूर्ण
रिया चक्रवर्ती थोड्याच वेळात बाहेर येण्याची शक्यता

5:35 pm (IST)

भाजप आमदार अतुल भातखळकरांचं गृहमंत्री अमित शाहांना पत्र
'सुशांतसिंह प्रकरणात बॉलीवूड, ड्रग्स, राजकारण्यांचे संबंध उघड'
'संबंध दडपण्याचा राज्य सरकारमधील कोणत्या शक्तीनं प्रयत्न केला?'
या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी करा - अतुल भातखळकर

5:32 pm (IST)

गडचिरोली जिल्ह्याला गोसीखुर्द धरणाच्या विसर्गाचा फटका
देसाईगंज शहरातल्या काही भागात पुराचं पाणी शिरलं
आतापर्यंत 300 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं
3 जणांना पुराच्या पाण्याच्या विळख्यातून वाचवण्यात यश
कोंढाळा गावाजवळ 3 शेतकऱ्यांची पुराच्या पाण्यातून सुटका

4:16 pm (IST)

संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या मुंबईत दाखल
गौरव आर्या उद्या 'एनसीबी'समोर चौकशीला हजर राहणार
रिया चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवल्याचा गौरव आर्यावर आरोप
गौरव आर्याला 'एनसीबी' उद्या ताब्यात घेऊ शकते -सूत्र

3:42 pm (IST)

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी 
वैनगंगा आणि बावनथडी नदीला आला पूर
नदीकाठावरील गावांमध्ये शिरलं पुराचं पाणी
गोसेखुर्द, बावनथडी धरणाचे दरवाजे उघडले
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात शेतीला तलावाचं स्वरूप
'नुकसानीचे लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी'
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

2:55 pm (IST)

चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील लाडज गावाला पुराच्या पाण्याचा विळखा
'एनआरएफ'ची टीम लाडज गावासाठी नागपूरवरून रवाना
बोटींच्या साहाय्यानं लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं होतेय मोठी वाढ
ब्रह्मपुरीतील जवळपास 10 गावांना बसलाय पुराचा तडाखा
अनेक गावांत पुराचं पाणी, शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली
लाडज गावातील ग्रामस्थांना एअरलिफ्ट करण्यावर विचार सुरू
चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हवाई दलाकडे मागितली मदत
ग्रुप कॅप्टन कांचन कुमारांशी संपर्क -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

2:44 pm (IST)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील काळवीट शिकार प्रकरण
अट्टल शिकारी विजय भोसले पोलिसांच्या जाळ्यात
शिकार करून मटण विकताना हत्यारासह आरोपी अटकेत
नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्या माहितीवरून केली कारवाई
वन विभाग आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

1:49 pm (IST)

नागपूर - कामाठी तालुक्याला पुराचा फटका
कामठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी
बिना गावातील अडीच हजार नागरिकांचं स्थलांतर
एसडीआरएफ पथकानं लोकांना सुखरूप बाहेर काढलं

Load More
मुंबई, 30 ऑगस्ट : देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील घडामोडींचा आढावा.