वाशिम जिल्ह्यात ब्रिटनहून आलेल्या 6 नागरिकांपैकी एकाला कोरोनाची लागण, रिसोड इथं दाखल झालेल्या पती-पत्नी आणि मुलापैकी मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, उद्या सर्वांचे नमुने तपासणीला पुण्यात पाठवणार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय, बांधकाम क्षेत्रात काही मूठभर खासगी लोकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जातात, या पत्रात 72 टक्क्यांनी रेडी रेकनर कमी केल्याचं मी दाखवून दिलंय, सर्व नागरिकांना फायदा होईल असे निर्णय घेतले पाहिजेत असे म्हटलंय अन्यथा मी पीआयएल दाखल करेन असं पत्रात लिहिलं आहे -देवेंद्र फडणवीस
कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही, चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं काम नाही -देवेंद्र फडणीस
संजय राऊत ट्विट करत असतात, त्यांच्यात खूप प्रतिभा आहे, त्यांना अनेक शेर, गाणी पाठ आहेत, संजय राऊतांना दुसरं काम नसतं त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्विट करत असतात, त्याच्यावर मी उत्तर कशाला देऊ? मी ईडीचा प्रवक्ता नाही, त्यांनाच विचारा -देवेंद्र फडणवीस
संजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेणार शिवसेना भवनात दु.2 वा. पत्रकार परिषद ईडीच्या नोटीससंदर्भात भाष्य करणार
शेतकरी हिताचा कायदा आम्ही केला आणि हे ट्रॅक्टर घेऊन निघत आहेत, शेतकऱ्याला न्याय आम्ही दिला, यांनी कधी दिला आहे का? हा कायदा आम्ही लागू केला -देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना हिताच्या निर्णयासाठी आमच्यात राजकीय मतभेद का आडवे येतात हेच कळत नाही, मोदींच्या या निर्णयामुळे राजकीय दुकानदारी बंद पडेल असं यांना वाटतं -देवेंद्र फडणवीस
नवीन कृषी कायद्यांची मागणी अनेक वर्षं -फडणवीस त्याबाबत आश्वासनं दिली -देवेंद्र फडणवीस 'कायदा करण्याची हिंमत कुणाची झाली नाही' 'त्या कायद्यात बाजार समिती बंदचा निर्णय नाही' शेतकऱ्यांसाठी सर्व काही केलं -फडणवीस मग नरेंद्र मोदींना विरोध का? -फडणवीस
'आ देखे जरा किसमे कितना है दम' 'जमके रखना कदम मेरे साथीया' शिवसेना खासदार संजय राऊतांचं ट्विट
उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार 8 वर्षांच्या मुलाचा ड्रेनेज टाकीत मृतदेह झाकण नसल्यानं दुर्घटना; नातेवाईकांचा आरोप बंद पडलेल्या कंपनीच्या आवारातील ड्रेनेज टाकी यश भुजंग असं मृत मुलाचं नाव मुलगा 6 दिवसांपासून होता बेपत्ता उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल