त्या पार्टीत ड्रग्ज घेतली गेली का? करण जोहरने सोडलं मौन
माध्यमांमधून सतत होणाऱ्या आरोपांना अखेर करण जोहरने उत्तर दिलं आहे. Tweet करून त्याने त्या पार्टीविषयी खुलासा केला.
काय म्हणाला करण जोहर?
क्षितीज रवी प्रसाद किंवा अनुभव चोप्राला मी ओळखत नाही.
मी ड्रग्ज घेत नाही किंवा त्यासाठी कोणाला प्रोत्साहन देत नाही.
मी आयोजित केलेल्या कुठल्याही पार्टीत ड्रग्ज घेतले गेले नाहीत.
माझ्यावरचे बिनबुडाचे आरोप थांबले नाहीत तर कायदेशीर कारवाई करीन