• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE: इंग्लंडहून 'या' शहरात आले 44 प्रवाशी, प्रशासनाची बारीक नजर

LIVE: इंग्लंडहून 'या' शहरात आले 44 प्रवाशी, प्रशासनाची बारीक नजर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 25, 2020, 20:31 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:37 (IST)

  जळगाव - मुक्ताईनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लीटर पाणी वाया

  21:18 (IST)

  एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस -सूत्र
  30 तारखेला हजर राहण्याचे समन्स
  एकनाथ खडसेंकडून मात्र इन्कार
  नोटीस न मिळाल्याची खडसेंची माहिती

  20:19 (IST)

  इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांवर प्रशासनाची नजर
  25 नोव्हेंबरपासून औरंगाबादमध्ये 44 नागरिक
  सर्वांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवली
  सर्व प्रवाशांचा पालिका प्रशासनाकडून शोध
  44 पैकी 11 जणांची RTPCR चाचणी 
  इंग्लंडहून आलेली एक महिला पॉझिटिव्ह
  महिलेत कोणतीही लक्षणं नाहीत, तब्येत स्थिर

  19:47 (IST)

  'भारतातील युवाशक्ती माशेलकरांनी ओळखली'
  राज्याचं स्टार्टअप धोरण बनवलं -फडणवीस
  'महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी झाली'
  रोजगार निर्मिती झाली, कृषी क्षेत्रात सर्वाधिक स्टार्टअप -फडणवीस
  'सध्याचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे'
  'राज्यातील शेतकऱ्यांना स्टार्टअपचा फायदा'
  अडते टाळून थेट फायदा -देवेंद्र फडणवीस
  याचं श्रेय डॉ.माशेलकर सरांचं -फडणवीस

  19:42 (IST)

  पुणे - अटल संस्कृती गौरव पुरस्कार
  ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांना पुरस्कार
  फडणवीसांच्या हस्ते डॉ.माशेलकरांचा सत्कार
  'सत्कारामुळे माझा बायोडाटा समृद्ध झाला'
  अटलजी देशाला पडलेलं एक स्वप्न -फडणवीस
  संवेदनशील, कविमनाचे अटलजी -फडणवीस
  'अटलजी यांचं सर्वात मोठं योगदान'
  दबाव झुगारून अणुचाचणी केली -फडणवीस
  'जी करायला आधीचे सत्ताधारी कचरत होते'
  'अणुचाचणी केल्यावर अनेक देशांचे निर्बंध'
  'पण एकेक करून त्या देशांनी निर्बंध काढले'
  'हळद, बासमतीच्या पेटंटची लढाई जिंकून दिली'
  फडणवीसांनी डॉ.माशेलकर सरांचं केलं कौतुक
  'मानवकल्याण व्हावं म्हणून काम करणारे तत्त्वज्ञ'
  एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या कर्मयोग्याला -फडणवीस

  19:29 (IST)

  सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती स्थिर, हॉस्पिटल प्रशासनाची माहिती

  18:37 (IST)

  पुणे - बालगंधर्व रंगमंदिरात अटल संस्कृती गौरव पुरस्कार, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांना पुरस्कार

  18:17 (IST)

  कोरेगाव-भीमा इथं जयस्तंभ मानवंदना कार्यक्रम
  1 तारखेच्या कार्यक्रमावर सरकारकडून निर्बंध
  बाहेरच्या वाहन, व्यक्तीला प्रवेश नाही
  यंदा प्रतीकात्मक मानवंदना, केवळ पासधारकांना एन्ट्री
  सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही
  घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहता येणार
  अफवा, फेकन्यूज पसरवल्यास कारवाई
  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुखांची माहिती

  17:43 (IST)

  देवेंद्र फडणवीसांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हटलं आहे, ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणारच नाही -विजय वडेट्टीवार

  17:33 (IST)

  मुंबई - धारावीकरांसाठी सकारात्मक बातमी
  धारावीत आज एकही कोरोना रुग्ण नाही

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स