LIVE: किरीट सौमय्यांवर शिवसेना आमदार दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स
Lokmat.news18.com | December 16, 2020, 9:24 PM IST
Last Updated December 16, 2020
auto-refresh
Highlights
9:24 pm (IST)
नाशिक - पोलीस अकादमीत तरुणाची आत्महत्या
स्टाफ क्वार्टरमधील राहत्या घरी संपवलं जीवन
गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कौटुंबिक किंवा प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्राथमिक अंदाज
कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याची माहिती
8:45 pm (IST)
राज्यात दिवसभरात 4,304 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,678 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94 टक्क्यांवर
राज्यात सध्या 61,454 अॅक्टिव्ह रुग्ण
8:29 pm (IST)
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या नर्सेस स्टापचा दीड महिन्याचा पगार उद्याच जमा होणार, 'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
उर्वरित पगारही 21 तारखेला मिळणार, स्टापच्या लॉजिंगची व्यवस्थाही कायम राहणार, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमारांच्या आश्वासनानंतर नर्सेसचं आंदोलन मागे, पुणे मनपाकडून कोविड सेंटरला 7.5 कोटी जमा, 3 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकीत होता
8:25 pm (IST)
मुंबई - लालबागमधील सिलेंडर स्फोट दुर्घटना
साराभाई इमारत दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू
गॅस सिलेंडर स्फोटातील मृतांची संख्या 8 वर
8:20 pm (IST)
म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर
सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार -मुख्यमंत्री
7:30 pm (IST)
आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर आमदार प्रताप सरनाईक 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
7:14 pm (IST)
शेतकरी आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, केंद्र सरकार शेतकरी हितासाठी काम करत नसल्याचा आरोप
7:06 pm (IST)
कोल्हापूर जिल्ह्याच्या कोडोलीतील संतापजनक घटना
गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघड
सामाजिक कार्यकर्त्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन
पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील डॉक्टर ताब्यात
एका हॉस्पिटलमध्ये सुरू होतं गर्भलिंग निदान
6:50 pm (IST)
सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका
'हे सरकार नेहमी तर्कशून्य निर्णय घेत असतं'
'हिंमत असेल तर आमदार फोडून दाखवा'
...तर तुमचं डोकं फुटेल -मुनगंटीवार
'पण आमचा एकही आमदार फुटणार नाही'
सुधीर मुनगंटीवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर
6:50 pm (IST)
जलजीवन मिशन अभियानांतर्गत 'जल आराखडा' तयार करा -मुख्यमंत्री