liveLIVE NOW

LIVE: समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची लागण

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.

 • News18 Lokmat
 • | October 14, 2020, 21:31 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:47 (IST)

  पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मुसळधार
  निमगाव केतकीमध्ये अनेक वाहनं वाहून गेली
  अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी
  पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान

  21:30 (IST)

  कारशेडचं पितळ उघड केल्याच्या पोटशूळीतूनच महाराष्ट्रातील जनसहभागाच्या योजनेवर अविश्वास, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

  21:30 (IST)

  माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
  'लोकसहभागातून 6 लाखांवर जलयुक्त शिवाराची कामं'
  '1 ते 5 लाखांच्या कामांचे टेंडर देण्याचे अधिकार'
  जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर दिलेले अधिकार -महाजन
  'कॅग'नं कुठंही भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलेलं नाही -महाजन
  'केवळ राजकीय हेतूनं प्रेरित होऊन चौकशी लावली'
  गिरीश महाजनांचा राज्य सरकारवर आरोप

  20:39 (IST)

  सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार
  कोयना, वीर, उरमोडी धरणाचे दरवाजे उघडले
  कोयना, नीरा, कृष्णा, उरमोडी नदीच्या पातळीत वाढ
  नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अलर्ट

  20:37 (IST)

  मोनोरेलची सेवा 18 तारखेपासून टप्प्याटप्यानं सुरू होणार

  20:20 (IST)

  पुण्यात दिवसभरात कोरोनाच्या 528 रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 1413 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात आज 39 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 10 हजार 833

  20:2 (IST)

  खंडाळा तालुक्यातील वीर धरण 100 टक्के भरलं
  वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू
  नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

  20:1 (IST)

  शैक्षणिक सुधारणांसाठी 'स्टार्स' प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
  प्रकल्पात महाराष्ट्रासह इतर 5 राज्यांचा समावेश

  19:41 (IST)

  राज्यात आज 10 हजार 552 नव्या रुग्णांची भर
  राज्यात आज कोरोनामुळे 158 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात आज 19 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 84.71 टक्के

  19:25 (IST)

  महाराष्ट्राच्या काही भागांत पावसामुळे पिकांचं नुकसान
  विजय वडेट्टीवारांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश
  'केंद्राच्या टीमनं राज्यात यावं अशी मागणी करणार'
  राज्य-केंद्राला शेतकऱ्यांना मदत करावी लागणार -वडेट्टीवार
  'पंचनामे करून मदतीसाठी पत्रव्यवहार लगेच करणार'
  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती

  मुंबई, 14 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.