LIVE: मुंबईत आज पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या 3000 पार, 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 19, 2021, 19:54 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:22 (IST)

  पुणे जिल्ह्यात आज 5 हजारांचा आकडा पार
  पुणे जिल्ह्यात दिवसभरात 5065 नवे रुग्ण
  पुणे शहरात 2834, पिंपरी-चिंचवड 1326 रुग्ण
  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 664 नवे रुग्ण

  20:41 (IST)

  'पब, बार, समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस मार्शल लक्ष ठेवून'
  कोरोना वाढतोय चिंतेची, भीतीची बाब -महापौर
  मुंबईकरांनो, कोरोनाला गांभीर्यानं घ्या -महापौर
  'प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असलाच पाहिजे'
  'मॉल, पब या ठिकाणी जाणारे नागरिक'
  'चाचणी बंधनकारक करायची की नाही?'
  याबद्दलचा विचार सुरू आहे -किशोरी पेडणेकर
  'रोज जाणारे लोक चाचणी कसे करणार? हाही प्रश्न'
  लोकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे -महापौर
  मॉल, गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणार -महापौर

  20:23 (IST)

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता कायम
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2508 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात 1168 रुग्ण कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 5 जणांचा मृत्यू

  20:1 (IST)

  राजीनाम्याच्या वृत्तावर गृहमंत्री अनिल देशमुखांचं ट्विट, राजीनाम्याच्या बातमीत तथ्य नाही, मिहान प्रकल्पासंदर्भात पवारांची भेट, वाझे प्रकरणाच्या तपासावरही चर्चा

  19:43 (IST)

  राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ
  राज्यात दिवसभरात 25 हजार 681 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 14,400 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.42 टक्के
  राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 77,560

  19:36 (IST)

  मुंबईकरांची कोरोना रुग्णवाढीनं चिंता वाढली
  मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्या 3000 पार
  मुंबईत दिवसभरात 3 हजार 62 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू

  19:23 (IST)

  मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

  19:14 (IST)

  पुण्यात दिवसभरात 2834 कोरोनाचे रुग्ण
  सलग तिसऱ्या दिवशी 2500च्या वर रुग्णवाढ
  पुण्यात दिवसभरात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  19:3 (IST)

  नागपूरमध्ये कोरोनाचं संकट आणखी गडद
  नागपुरात दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरात दिवसभरात 3235 नव्या रुग्णांची नोंद

  19:0 (IST)

  मुंबईत दररोज 1 लाख नागरिकांना लस देण्‍याचं उद्द‍िष्‍ट, निर्देशित प्रत्‍येक खासगी रुग्‍णालयानं दररोज किमान 1 हजार जणांचं लसीकरण करावं, महापालिका आयुक्‍त इक्बालसिंग चहल यांचे सक्‍त निर्देश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स