निरुपमांवर मनसेचा पलटवार, कार्टूनमधून दिली भटक्या कुत्र्याची उपमा

निरुपमांवर मनसेचा पलटवार, कार्टूनमधून दिली भटक्या कुत्र्याची उपमा

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या वादग्रस्त विधानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उत्तर दिलं आहे. कार्टूनच्या माध्यमातून मनसेनं निरुपमांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

  • Share this:

अमित राय, प्रतिनिधी

मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या वादग्रस्त विधानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उत्तर दिलं आहे. कार्टूनच्या माध्यमातून मनसेनं निरुपमांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मनसेनं कार्टुनच्या माध्यमातून निरुपमांना भटक्या कुत्र्याची उपमा दिली आहे.

संजय निरुपमांकडे हिम्मत असेल तर एक दिवस मुंबई बंद करून दाखवावी. आपली खुर्ची वाचवण्यासाठी निरुपम हे सगळं करत असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. यावर मनसेनं एक कार्टून तयार केलं आहे आणि त्यात त्यांनी संजय निरुपम यांना भटक्या कुत्र्याची उपमा दिली आहे.

दरम्यान, 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल' असं वादग्रस्त वक्तव्य संजय निरूपम यांनी केलं होतं.नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूसच करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत असं म्हणत निरुपमांनी उत्तर भारतीयांचे तर गोडवे गायलेच पण त्यांनी मराठी माणसाचा मात्र अपमान केला अशा प्रतिक्रिया आता उमटत आहे.

उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. हीच माणसं संपूर्ण मुंबई चालवतात. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका असा इशाराही यावेळी संजय निरुपम  यांनी केला.

जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवलं तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरुपम यांनी दिला.

VIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही

 

First published: October 8, 2018, 1:01 PM IST

ताज्या बातम्या