वारकऱ्यांसोबत हरिनामाच्या गजरात विनोद तावडेही झाले दंग

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासीयांच्या एकात्मता आणि समर्पणाचे प्रतिनिधित्व करणार्‍या वारीत सामील होणे हा भक्तिमय अनुभव आहे.

  • Share this:

भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दरवर्षी ते वारीत नित्यनेमाने सहभागी होतात.

नातेपुते येथे श्री. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी तावडे सहभागी झाले. नातेपुते ते मांडवे या पालखीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांबरोबर पायी चालत व वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी हा मार्ग पूर्ण केला.

यावेळी तावडे यांनी वारकऱ्यांबरोबर टाळ आणि मृदुंगाचा ताल धरला आणि मुखाने जय हरी विठ्ठलाचा जप केला. वारी म्हणजे परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्याचा मार्ग आहे. वारीच्या माध्यमातून समाजाला समाजामध्ये जाऊन पाहणे व त्या समाजाकडून सकारात्मक गोष्टी शिकणे तसेच वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा असा संदेश देणारी ही वारी असते असं त्यांनी सांगितलं.

पंढरपूरच्या या आषाढी वारीला राज्य सरकारच्या वतीने सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत असंही तावडे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासीयांच्या एकात्मता आणि समर्पणाचे प्रतिनिधित्व करणार्‍या वारीत सामील होणे हा भक्तिमय अनुभव असतो. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी सक्रीय राहण्याचे बळ मला लाभो, अशी विठू माऊली चरणी प्रार्थना केली. माऊली माऊली..!! असं ट्विट तावडे यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या