मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांकडून नियमांची पायमल्ली, शेकडो कार्यकर्त्यांची जमवली तोबा गर्दी

ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांकडून नियमांची पायमल्ली, शेकडो कार्यकर्त्यांची जमवली तोबा गर्दी

चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.

चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.

चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.

लातूर, 6 डिसेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धास्थान चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी आवाहन केलं आहे. सगळ्यांनी ऑनलाईन दर्शन घेण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. मात्र, ठाकरे सरकारमधल्या एका मंत्र्याकडूनच मुखयमंत्र्यांच्या आवाहनाची पायमल्ली झाल्याचं समोर आलं आहे.

राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी स्वतःच्या मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

हेही वाचा...राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडूंची नौटंकी सुरु, भाजप महिला नेत्याचा घणाघात

6 डिसेंबर हा डॉ. बाबासहेबांच्या महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं श्रद्धास्थान चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करत ऑनलाईन दर्शन घेण्याची विनंती तमाम आंबेडकरी अनुयायांना केली होती. त्यानुसार सर्वांनीच या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शेकडो लोकांना एकत्र करत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलं. याशिवाय उपस्थित बांधवांचे आभार देखील मानायला राज्यमंत्री विसरले नाहीत.

कालच सगळ्यांनी ऑनलाईन दर्शन करावं, असं आवाहन करणाऱ्या राज्यमंत्र्यांनीच गर्दी जमवल्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा...चंद्रकांतदादांनी शिवसेनेला शिताफीनं टाळलं, पण शरद पवारांवर केला चतुराईनं पलटवार

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलं दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत. सध्या राज्यात कोरोना संसर्ग आहे. या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन करावं. मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

चैत्यभूमीवर कुठेही कमीपण येऊ देणार नाही. असं आश्वासन देत कोरोना परिस्थितीचं भान ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. त्यांच्या अभिवादन कार्यक्रमात अनुयायांनी जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

First published: