• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • विदर्भात 10 पैकी 8 जागा युतीच्या ताब्यात, दोन जागांवर फटका

विदर्भात 10 पैकी 8 जागा युतीच्या ताब्यात, दोन जागांवर फटका

Maharashtra Lok Sabha Election Result 2019 : विदर्भामध्ये दोन जागांवर शिवसेना-भाजपच्या युतीला फटका बसला आहे.

 • Share this:
  नागपूर, 23 मे : लोकसभा निवडणूक 2019चे निकाल अखेर हाती आले आहेत. या निवडणुकीच्या निकालाची देशासहीत परेदशातही उत्सुकता होती. देशासह महाराष्ट्रातील जनतेनंही भाजप-शिवसेनेच्या युतीला आपला कौल दिला आहे. पण विदर्भामध्ये दोन जागांवर शिवसेना-भाजपच्या युतीला फटका बसला आहे. म्हणजे 10 पैकी आठ जागा युतीच्या ताब्यात गेल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2014मध्ये विदर्भातील सर्व दहा जागांवर युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विदर्भातील विजयी उमेदवार 1. गुरूचंच राज्य! नागपूरचे नितीन 'गड'करी, भाजपचा दमदार विजय केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह गडकरींनी आपला गड कायम राखला आहे. गडकरींनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला आहे. येथे गुरू (नितीन गडकरी) विरूद्ध शिष्य (नाना पटोले) अशी रंगतदार लढत होती. 2. भंडारा-गोंदियामध्ये भाजपचीच सरशी, सुनील मेंढेंनी राखली जागा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या सुनील मेंढे यांनी राखली आहे. सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला. या जागेवरील निवडणूक भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेससाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. पाहा:VIDEO : औरंगाबादचे नवे खासदार जलील यांची पहिली प्रतिक्रिया 3.रामटेक गडावर पुन्हा फडकला भगवा, शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा विजय विदर्भातली रामटेकच्या गडावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा पराभव केला आहे. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 4.भावना गवळींचा विजयाचा इतिहास, पाचव्यांदा जिंकली खासदारकीची निवडणूक शिवसेनेच्या भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील 1999पासूनचा आपला इतिहास लोकसभा निवडणूक 2019मध्येही कायम ठेवला आहे. जनतेनं भावना गवळी यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. येथे गवळींनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना पराभवाची धूळ चारली आहे. पाहा:SPECIAL REPORT : काँग्रेसचं 'प्रियांका कार्ड' का झालं फेल? 5.वर्ध्यातही मोदी फॅक्टर,भाजपच्या रामदास तडस यांची सेकंड इनिंग विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघातही मोदी लाटच पाहायला मिळाली. मोदी लाटेत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांना पराभव पत्करावा लागला आहे. तडस यांना मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश आलेलं आहे. 6. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना धक्का, भाजपच्या संजय धोत्रेंचा विजयी चौकार अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला आहे. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र प्रचंड प्रमाणात बसल्याचं दिसत आहे. 7. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते यांचा विजय गडचिरोलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचा दणदणीत विजय झाला आहे. नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षानेही येथे उमेदवार उतरवले होते. पण खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. पाहा:VIDEO : भाजपच्या विजयाच्या शिल्पकारांचं असं झालं जंगी स्वागत 8. बुलडाण्यात शिवसेनेनं गड राखला ! शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांची हॅटट्रिक बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. जाधव यांनी काँग्रेसने डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा दणदणीत पराभव केला आहे. येथे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत होती. मोदी त्सुनामीमध्ये जाधव यांना फायदा झाल्याचं जाणकारांचं मत आहे. जाधव यांन्या विजयाची ही हॅटट्रिक आहे. 9. नवनीत राणांच्या 'आँधी'मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ भुईसपाट अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. राणा यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ गेली 25 वर्षं शिवसेनेच्याच ताब्यात होता. त्यामुळे हा निकाल  शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 2014च्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांचा पराभव केला होता. मात्र पाच वर्षांनंतर राणांनी हा डाव उलटवत आपल्या 'आँधी'मध्ये अडसूळ यांना भुईसपाट केल आहे. 10. चंद्रापुरात भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून केंद्रीय मंत्र्याचा पराभव चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का पत्करावा लागला आहे.  भाजपचे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा दणदणीत पराभव केला आहे. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर गेली 15 वर्षं भाजपचा कब्जा होता. पण या निवडणुकीत काँग्रेसला भाजपाच पराभव करण्यास यश मिळालं. महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019 भाजप + : 41 काँग्रेस + : 6 वंबआ : 1 लोकसभा निवडणूक 2019 भाजप + : 353 जागा काँग्रेस + : 91 जागा इतर : 98 VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत
  First published: