S M L

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोठे भाऊ उद्धव ठाकरेच पण..., फडणवीसांनी सांगितली भावकी

live Maharashtra Lok Sabha Election Result 2019 - महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा परिणाम 2019/महाराष्ट्राचे लाईव्ह इलेक्शन रिजल्ट

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 06:34 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोठे भाऊ उद्धव ठाकरेच पण..., फडणवीसांनी सांगितली भावकी

मुंबई, 23 मे : देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचं हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरतं झोपवलं आहे, असं आत्ता हाती आलेले कल सांगतात. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मोठा भाऊ कोण यावर मुख्यमंत्र्यांनी मोठ्या हुशारीने उत्तर दिलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या विजयानंतर राज्यात मोठा भाऊ कोण असा प्रश्न विचारला असता त्यावर, 'उद्धव ठाकरे हे आमचे मोठे भाऊ आहेत. पण उद्धव ठाकरेंचे मोठे भाऊ हे नरेंद्र मोदी आहेत' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांना राग आला नाही अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

पत्रकार परिषदेमधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले तर हरलेल्यांनी नाराज न होता आत्मचिंतन करा असा सल्लाही फडणवीसांनी दिला.  निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाही जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर नाही. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. तर युती 43 जागांवर आघाडीवर आहे.


अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वात मोठा उत्सव होता. 17व्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल आज जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये भाजपने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या विजयाचा जल्लोष सध्या सगळीकडे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची अधिकृत आकडेवारी दिली जात आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 48 पैकी सर्व जागांचे कल जाहीर झाले आहेत. त्यापैकी तब्बल 43 जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

हेही वाचा : LIVE Lok Sabha Election Result 2019: औरंगाबादमध्ये मोठा फेरबदल, इम्तियाज जलील पिछाडीवर

Loading...

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 48जागांचे कल असे आहेत. भाजप-युतीला 47 पैकी 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रसे राष्ट्रवादी फक्त 6 जागांवर आघाडी आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत.

 हे आहेत आत्तापर्यंतचे धक्कादायक 10 कल

कर्नाटकमधील गुलबर्ग येथून मल्लिकाअर्जून खर्गे पिछाडीवर आहेत.

पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी

कर्नाटकमधील गुलबर्ग येथून मल्लिकाअर्जून खर्गे पिछाडीवर आहेत.

केरळमधील तिरुवनंतपूरममधून शशी थरुर पिछाडीवर

पंजाबमधील आनंतपूर साहिबा मतदारसंघातून मनिष तिवारी

फतेपूर सिकरी राज बबर येथून पिछाडीवर

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून राहुल गांधी पिछाडीवर भाजपच्या स्मृती इराणी यांची आघाडी

फतेपूर सिक्री राज बब्बर येथून पिछाडीवर


VIDEO : रश्मी ठाकरेंनी भरवला उद्धवना विजयाचा पेढा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2019 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close