औरंगाबाद, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे जास्त खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सर्वच धार्मिक सणांना गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रमजान महिन्यातही नियम लागू राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
अनिल देशमुख आज औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात आज मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार,खासदार,महापौर,पोलीस आयुक्त,विशेष पोलीस महानिरीक्षक,जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक & अन्य अधिकारी यांची बैठक घेऊन #Covid19 संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील उपयायोजनेबद्दल माहिती दिली.
हेही वाचा -'ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत लॉकडाऊनला शिथिलता, पण जिल्हाबंदी कायम'
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक ठिकाणी गर्दी करू नका, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक देवस्थानं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या सणांबद्दल नियम बनवले आहे त्यामुळे रमजानला वेगळं काही होणार नाही. रमजान महिन्यात नियम पाळावे लागतील, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. मुस्लीम समाजाने यंदा घरी राहूनच रमजान साजरी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या जाणार आहे. त्यामुळे गाव खेड्यातही यंत्रणा पोहचली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवक पोहोचून तपासणी करणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
हेही वाचा -GROUND REPORT : कोरोनावर उपचार करताना कोल्हापुरात आढळला धक्कादायक प्रकार
औरंगाबाद आणि नगरमध्ये कोरोनाचे संकट असताना सारीच्या आजारानेही डोकं वर काढलं आहे. औरंगाबादमध्ये सारीचे 228 रुग्ण आहे. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. या रुग्णांना कोरोनाबाधित रुग्णांपासून दूर ठेवले जात आहे. तसंच जिल्ह्यात 102 तबलिगी आल्याची नोंद आहे. या सर्वांना वेगळं ठेवण्यात आहे. ज्या तबलिगींनी ट्रॅव्हल व्हिसाचा नियम भंग केला त्यांच्यावर कारवाई होणार, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.
संपादन - सचिन साळवे