बारावीच्या निकालाची तारीख आज होणार जाहीर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 29, 2017 08:59 AM IST

बारावीच्या निकालाची तारीख आज होणार जाहीर

29 मे : सीबीएसईच्या बारावीचा निकाल काल लागल्यानंतर राज्य माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आज (सोमवारी) जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी याबाबतची माहिती दिला आहे. त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत उलट-सूलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे.

विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतरच बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

अशा प्रकारे पाहता येईल विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल…

    Loading...

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर लॉग ईन करा
  • वेबसाईटवर लॉगईन केल्यानंतर class 12th (XII) Higher Secondary Certificate HSC results 2017 या लिंकवर क्लिक करा
  • यानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले नाव, रोल नंबर, जन्म तारीख द्या
  • यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल
  • विद्यार्थी हा रिझल्ट डाऊनलोडही करु शकतील

विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in. वेबसाईट व्यतरिक्त results.nic.in, examresults.net या वेबसाईट्सवर ही पाहू शकातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2017 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...