मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Maharashtra Rain : कमी वेळात राज्यभर मुसळधार, बदललेल्या मान्सून पॅटर्नचा धुडगूस

Maharashtra Rain : कमी वेळात राज्यभर मुसळधार, बदललेल्या मान्सून पॅटर्नचा धुडगूस

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने दैना उडाली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain)

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने दैना उडाली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain)

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने दैना उडाली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 09 सप्टेबर : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने दैना उडाली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain) तसेच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अवघ्या काही तासांच्या झालेल्या पावसाने थैमान घातल्याने नागरिकांची आणि गणेश मंडळांची चांगलीच धावपळ झाली. हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस पाऊस होईल असा इशाराही दिला आहे.

ठाण्यात रेल्वे सेवा विस्कळीत

मुसळधार पावसाने आज ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याणमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रेल्वे वाहतुकीवर या पवासाचा प्रचंड मोठा परिणाम पडलाय. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीक झालीय. सुरुवातीला नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याची माहिती समोर आली होती.

हे ही वाचा : महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं?

ही माहिती ताजी असतानाच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. ठाण्यापासून पुढे कळवा ते कल्याणपर्यंत वाहतूक खोळंबली आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यापासून पुढे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ पाणी भरलं आहे. याशिवाय मुंब्र्यात तर ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

यवतमाळमध्ये हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

यवतमाळ जिल्ह्याच्या मुकुटबन परीसरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.विजांच्या कडकडा सह जोरदार आलेल्या पावसाने शेतातील उभ पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतात कुठलाही काम करता येत नाही. त्यामुळे गवत वाढले.  परिणामी  पिकाची वाढ खुंटत उत्पादनावर परिणाम होणार आहे होत आहे. या पावसाने जिकडेतिकडे पाणीच पाणी साचले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मानला जात असला तरी काही भागात तो डोकं दुखी ठरत आहे.

हे ही वाचा : विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्गांमध्ये बदल

उस्मानाबाद जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने धुडगूस

उस्मानाबाद जिल्ह्यात काल पावसाने जोरदार हजेरी लावली उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा ,परंडा तालुक्या सह उस्मानाबाद शहरात ही पावसाने जोरदार हजेरी लावली. परंडा तालुक्यातील आसू मंडळात तर 78 .3 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. जवळा, आणळा, मंडळात ही जोरदार पाऊस झाल्याने लहान प्रकल्प भरून पाणी रस्त्यावर आल्याने  या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 555 .3 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. आज देखील ढगाळ वातावरण कायम असून पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

First published:

Tags: Konkan, Rain fall, Thane, Thane (City/Town/Village), Vidarbha