मुंबई 04 डिसेंबर: पदवीधर मतदारसंघांमध्ये झालेल्या पराभवाने भाजपला (BJP) धक्का बसला आहे. पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले यात ढसळून गेले आहेत. या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार शरसंधान केलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या पराभवावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पराभव स्वीकारला पाहिजे. पराभवाची कारणेही शोधली पाहिजे. शिवसेनेला सुद्धा मित्रपक्षाची कमतरता जाणवली असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. भाजपच्या कोअर कमेटीची आज मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीतही निवडणूक निकालांबाबात चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
विजयाचा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. त्यामुळे शरद पवार बोलतात पुढील 25 वर्षे सत्तेत राहू असं होत नसतं. तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे आमचा पराभव झाला हे मान्य आहे. मात्र येत्या काळात आमची स्ट्रटिजी वेगळी असेल. शिवसेनेला आता आत्मपरीक्षण करावं लागेल. शिवसेनेच्या पाठीत अमरावतीमध्ये राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असंही ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रासाठी सी टी रवी यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तीन दिवस भाजपटे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. बुथ बैठक, मंडल बैठक राष्ट्रीय अध्यक्ष घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.
तर पुणे व नागपूर येथील निवडणुकीत आम्ही बेसावध राहिलो असं मत ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. पराभवाच्या संदर्भात विश्लेषण हे त्या त्या विभागात जिथे पराभव झाला आहे तिथे जाऊन केल जाईल असंही त्यांनी सांगितलं.