News18 Lokmat

अखेर सरकारने चूक सुधारली,पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय रद्द

फडणवीस सरकारवर चोहीबाजुंनी टीका झाल्यानंतर अखेर पीक विम्यातून कर्जाची पन्नास टक्के रक्कम कापून घेण्याचा आदेश मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2017 06:55 PM IST

अखेर सरकारने चूक सुधारली,पीक विम्यातून कर्ज वसुलीचा निर्णय रद्द

30 मार्च : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून बॅकफूटवर असलेल्या फडणवीस सरकारवर चोहीबाजुंनी टीका झाल्यानंतर अखेर पीक विम्यातून कर्जाची पन्नास टक्के रक्कम कापून घेण्याचा आदेश मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलीये.

राज्य सरकारने जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना आदेश दिला.  या आदेशात राज्य सरकारने जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून त्यांची कर्जाची रक्कम वसुल केली जावी, असं स्पष्ट केलं. त्यामुळे बँकांना कर्जाचा हप्ता थकविलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यापैकी ५० टक्के रक्कम कापून घेता येणार होती. पण, या निर्णयामुळे राज्य सरकारवर सडकून टीका झाली.

अखेर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला. पीक विमा काँग्रेसच्या राज्यात 100 टक्के कर्जात ऍडजस्ट व्हायचा. गेल्यावेळी आम्ही बँकांना सांगितले की असं ऍडजस्ट करू नये पूर्ण विमा रक्कम द्यावी. यावर्षी पाऊस चांगला झाला म्हणून 50 टक्के कर्जाचे घ्यावे असं आम्ही सांगितलं असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

सहकार विभागानं काढलेल्या आदेशानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ही संभ्रमाची भावना दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. विरोधकांनी या आदेशाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना विरोधक घाबरवण्याचं काम करीत असल्याचा आरोपही मुनगंटीवार यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...