News18 Lokmat

पेट्रोलनंतर डिझेलचेही भाव 4 रुपयांनी होणार स्वस्त - मुख्यमंत्री

केंद्र सरकारच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत राज्य सरकारनेही इंधनावरच्या व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात केलीय. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झालं, पण आता त्यापाठोपाठ डिझेलच्या दरातही कपात होणार आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 12:07 PM IST

पेट्रोलनंतर डिझेलचेही भाव 4 रुपयांनी होणार स्वस्त - मुख्यमंत्री

नाशिक, 05 ऑक्टोबर : केंद्र सरकारच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत राज्य सरकारनेही इंधनावरच्या व्हॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात केलीय. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झालं, पण आता त्यापाठोपाठ डिझेलच्या दरातही कपात होणार आहे. डिझेलही 4 रुपयांनी स्वस्त करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

इंधन दरवाढीच्या भडक्यानंतर अखेर केंद्र सरकारला शुक्रवारी जाग आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने सर्व राज्यांनाही व्हॅटमध्येही अडीच रूपयांची कपात करण्याची सूचना केली होती. इंधनावर केंद्र सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता.

या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर 10.50 हजार कोटींचा भार पडणार आहे. या कपातीचा राज्य सरकारला आर्थिक फटका बसणार आहे. पण जनतेसाठी तो सहन करण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झालीये. त्यामुळे क्रुड तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. पण ऑइल कंपन्यांच्या प्राइसिंग पॉलिसीत सुधार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल जीएसटीत आलं तर दरात तफावत होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

VIDEO 'करिष्मानं माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...