Home /News /news /

सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत पण कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कर्ज काढू - जयंत पाटील

सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत पण कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कर्ज काढू - जयंत पाटील

लॉकडाऊनमुळे सगळा व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारकडे पगार देण्याचे पैसे नाहीत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

    मुंबई, 08 जून : राज्यावर कोरोनाचं संकट असताना लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात कोरोनाच्या महामारीमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि सरकारी यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांचे पगार कसा द्यायचा असा प्रश्न आता सरकारसमोर आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र शासनावर सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहे. लॉकडाऊनमुळे सगळा व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारकडे पगार देण्याचे पैसे नाहीत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. मात्र, या सर्व परिस्थिती मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते सांगली इथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सगळे व्यवहार ठप्प असल्यामुळे सरकारच्या तिजोरीत आर्थिक अडचण आहे. फरार नीरव मोदीला सगळ्यात मोठा धक्का, सर्व मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे जनतेने वेगवेळ्या स्वरुपात दिलेल्या कराच्या माध्यमातून चालत असतं. पण राज्यावर कोरोनाचं संकट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. सगळे व्यवहार आणि व्यापार ठप्प झाला. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कर जमा झाला नाही. अशात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचा असा प्रश्न आहे. पण यात आम्ही सकारात्म मार्ग काढू आणि वेळ प्रसंगी पगार देण्यासाठी कर्ज काढू असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पेट्रोलवर नको दारुवर कर वाढवा, मनसेने केली ठाकरे सरकारकडे मागणी लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल आटला. त्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर वरचा व्हॅट 2 रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा अशी मागणी केला आहे. राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप दारु विक्रीला सरकारने महिनाभरापूर्वीच परवानगी दिली होती. त्यानंतर वाईन शॉप्सवर देशभर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक राज्य सरकारांनी दारुवर भरमसाठ करही लादला होता. तोच धागा पकडत बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले, महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर 2 रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढविला , सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार. सूट मिळताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर संपादन - रेणुका धायबर
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या