'त्या' 1000 तूर शेतकऱ्यांची होणार चौकशी

'त्या' 1000 तूर शेतकऱ्यांची होणार चौकशी

जास्त तूर विकणाऱ्यांनी खरंच तेवढी तूर पेरली होती का ? याचीही सरकारमार्फत चौकशी होणार आहे

  • Share this:

28 एप्रिल : सहा दिवसांनंतर अखेर तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. 22 एप्रिलपर्यंत ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांची तूर खरेदी होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाने तूर विक्री करणाऱ्या 1000 व्यापाऱ्यांची यादी तयार झाली असून त्यांची चौकशी होणार आहे.

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावाने तूर विकलेल्या व्यापाऱ्यांची सरकारमार्फत चौकशी होणार आहे. सर्वाधिक तूर विकलेल्या 1000 विक्रीदारांची यादी तयार करण्यात येणार असून त्यांचे सातबारेही तपासले जाणार आहेत.

जास्त तूर विकणाऱ्यांनी खरंच तेवढी तूर पेरली होती का ? याचीही सरकारमार्फत चौकशी होणार आहे. पणन महामंडळानी यासंबंधीचा जीआर काढलाय.

काय आहे नियमावली ?

- नाफेड केंद्रावर 22 तारखेपर्यंतच्या नोंदणीकृत तूरीचीच खरेदी

Loading...

- नोंदणी झालेल्या 10 लाख क्विंटलपर्यंत तुरीची खरेदी होणार

- खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचे तूर पेरणी नोंदणीचे 7/12 तपासणार

- तुरीची बिलं आधारकार्ड सलग्न बँक खात्यातच जमा होणार

- नाफेड केंद्रावर नोंदणी न झालेल्या तुरीचे पंचनामे होणार

- व्यापारी, परराज्यातील विक्रादारांची तूर नाफेड घेणार नाही

- शेतकऱ्यांच्या नावाने तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी होणार

- यापूर्वी जास्त तूर विकणाऱ्यांचे 7/12 उतारे तपासणार

- जास्त तूर विकणाऱ्या पहिल्या 1000 शेतकऱ्यांची चौकशी होणार

- नाफेड तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...