महाराष्ट्र सरकारची ब्लू प्रिंट तयार: फडणवीस मुख्यमंत्री, तर दोन उपमुख्यमंत्री!

महाराष्ट्र सरकारची ब्लू प्रिंट तयार: फडणवीस मुख्यमंत्री, तर दोन उपमुख्यमंत्री!

शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांचा विचार करता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: राज्यात सत्तस्थापन करण्यासंदर्भात भाजप आणि शिवसेना यांच्यात टशन सुरू आहे. भाजपने काल (बुधवारी) विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक होत असून आदित्य ठाकरे यांची गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचे सरकार असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पण सत्तेत भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणाचा किती वाटा असेल याबाबत एकमत झाले नाही. शिवसेनेने 50-50 फॉर्म्युलाची मागणी केली आहे. त्यावर 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहणार असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे.

राज्यात सुरु असलेल्या या राजकीय घटामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांचा विचार करता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. यातील एक उपमुख्यमंत्री भाजपचा तर एक शिवसेनेचा असेल. शिवसेनेकडून अधिक मंत्रीपदांची देखील मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारमधील काही महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर केंद्रात देखील अधिकचे मंत्रिपद मिळू शकते. राज्यात उपमुख्यमंत्रीपद, अधिकचे खाती आणि केंद्रात राज्य अथवा स्वतंत्र कारभार असलेले मंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते. यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये अधिकृत कोणतीही चर्चा झालेली नाही. आज शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीनंतर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला आहे, अशा पद्धतीचे वृत्त पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले. लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्यानुसारच होतील. सरकार स्थापन करण्याची काही घाई नसल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 2014च्या तुलनेत कमी जागा मिळाल्याने बॅकफूटवर गेलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. 'जे जे शक्य होईल ते सर्व करणार,' असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळे सत्ता स्थापन करताना खातेवाटपाबाबत शिवसेना तडजोड करणार दिसत आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 09:50 AM IST

ताज्या बातम्या