शेतकरी संपाचा हाॅटेल व्यावसायिकांना फटका, भाज्यांचे भावही कडाडले

शेतकरी संपाचा हाॅटेल व्यावसायिकांना फटका, भाज्यांचे भावही कडाडले

शेतकरी संप आणि दलालांनी भाव वाढवल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांनाही फटका बसू लागलाय. तसंच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे.

  • Share this:

02 जून : शेतकरी संप आणि दलालांनी भाव वाढवल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांनाही फटका बसू लागलाय. तसंच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे.

कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांपर्यंत गेलीय. टोमॅटो १०० रुपये किलो झालाय. कोबी, फ्लॉवरचंही तसंच झालंय. यामुळे संप मिटला नाही तर घरच्या बजेटप्रमाणेच बाहेर खाणंही परवडणार नाही. कारण हॉटेल मालकही फार वेळ कळ सोसू शकणार नाहीत.

तर शेतकऱ्यांच्या संपामुळे ठाण्यात ३० ते ४० टक्के दुधामध्ये कपात झाली आहे. तर भाज्यांच्या गाड्या न आल्यामुळे कालचाच भाजीपाला आज दीड पटीने विकला जातोय.

याचा नाहक त्रास ग्राहकांना सहन करावा लागतोय .दररोजच्या भाज्यांच्या गाड्या येणं बंद झाल्यामुळे कालचाच माल विक्रेते विकत आहेत. आणि येत्या काही तासांत जर अशीच परिस्थिती राहिली तर भाज्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचं किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांच म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading