S M L

जगाचा पोशिंदा उद्या संपावर, पण संप यशस्वी होईल का ?

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शाश्वत शेतीचं तुणतुणं वाजवल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणनं आहे. पण लाखमोलाचा प्रश्न आहे तो असा की शेतकऱ्यांचा संप यशस्वी होणार का?

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 10:24 PM IST

जगाचा पोशिंदा उद्या संपावर, पण संप यशस्वी होईल का ?

महेंद्र मोरे आणि प्रशांत बाग, मुंबई

31 मे : शेतकरी संपावर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरलीय. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शाश्वत शेतीचं तुणतुणं वाजवल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणनं आहे. पण लाखमोलाचा प्रश्न आहे तो असा की शेतकऱ्यांचा संप यशस्वी होणार का?

शेतकऱ्यांची स्थिती दाखवणारे हे काही प्रातिनिधीक वक्तव्य. शेतकरी कुठलाही असो मराठवाड्यातला किंवा विदर्भातला त्याची परिस्थिती सारखीच आहे. शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांचं म्हणून जे आर्थिक धन असतं, त्या जनावरांचा आठवडी बाजार उठवण्याची तयारी, शेतकऱ्यांची जमीन घ्यायची पण विचार बिल्डरधार्जिनी. काय होईल? शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय.दोन महिन्यांपूर्वीच शेतकऱ्यांनी संप जाहीर केलाय. त्यात नगर, नाशिकमधले काही हजर गावचे शेतकरी सहभागी होणार आहेत. ह्या दोन्ही जिल्ह्यातून पुणे-मुंबईला भाजीपाला, दूध, फळं पुरवली जातात. ती रसदच बंद करायची तयारी शेतकऱ्यांनी चालवलीय.

उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळालाच पाहिजे ह्या मागणीवर घोषणा झालेला शेतकरी संप आता कर्जमुक्तीजवळ येऊन थांबलाय. पण हा तात्पुरताच उपाय आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर उत्पादन खर्चावर आधारीत भावाशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यावरच शेतकरी, त्यांचे नेते यांची एकजूट होणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 07:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close