महाराष्ट्रातल्या या बळीराजानं पिकवला आगळा-वेगळा निळा भात, शरीरासाठी सगळ्यात पौष्टिक

महाराष्ट्रातल्या या बळीराजानं पिकवला आगळा-वेगळा निळा भात, शरीरासाठी सगळ्यात पौष्टिक

हे काळे दिसणारे तांदूळ बघीतले तर तुम्ही म्हणाल याला रंग मारलाय की काय? मात्र तसं नाही.

  • Share this:

शिर्डी, 12 सप्टेंबर : राज्यात शेतीविषयी वेगवेगळे आणि नवे प्रयोग सुरूच असतात. अशात आता एका नव्या भाताचा शोध लागला आहे. इंडोनेशियातील आगळा वेगळा निळा भात आपल्या महाराष्ट्रात पिकायला लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील अकोलेच्या विकास आरोटे यांनी या वाणाचे बियाणे बनवले असून आता कृषी विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या वाणाची लागवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या शेतकऱ्याची दखल घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

हे काळे दिसणारे तांदूळ बघीतले तर तुम्ही म्हणाल याला रंग मारलाय की काय? मात्र तसं नाही. हा भातच तसा आहे. मुळ इंडोनेशिया इथल्या या निळ्या भाताची माहिती अकोले तालुक्यातील मेहंदूरी गावातील शेतकरी विकास देवराम आरोटे यांना आसाम इथे कृषी प्रदर्शनात मिळाली. येताना त्यांनी सोबत 3 किलो बियाणे आणले. अनेक अपयशानंतर अखेर त्यांनी आता याचे बियाणे विकसीत केले असून 200 किलो बियाणे तयार केले आहे.

आता कृषी विभागाच्या मदतीने 10 एकरावर हे पिक लावण्यात आलं आहे. यातून मोठ्या प्रमाणात बियाणे तयार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भाताची साल निळी-जांभळी असून भाताचा रंग सुद्धा गर्द जांभळा आहे. सगळ्यात विशेष म्हणजे शिजविल्या नंतर या भाताचा रंग निळसर जांभळा होतो. भातात औषधी गुणधर्म असून फायबर, लोह मोठ्या प्रमाणात आहे. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींना हा फायद्याचा असल्याच सांगितलं जातं.

कमी जागेत जास्त उत्पादन आणि जास्त आर्थिक फायदा देणारे हे पिक आहे. या तांदूळाला साधारण 250 ते 500 रूपये दर मिळतो. आरोटे यांच्या कामाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विकास आरोटे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यानंतर आता गरज आहे या पिकाला आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 12, 2020, 1:38 PM IST

ताज्या बातम्या