कर्जमाफीसाठी अर्ज केला नसेल तर चिंता नाही, मुदत आता 1 मे पर्यंत!

कर्जमाफीसाठी अर्ज केला नसेल तर चिंता नाही, मुदत आता 1 मे पर्यंत!

राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची मुदत आणखी वाढवली आहे. आता राहिलेले शेतकरी 1 मे 2018 पर्यंत अर्ज करू शकतील.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: ज्या शेतकऱ्यांनी अर्जमाफीसाठी अद्याप अर्जच केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज करायचं राहुन गेलं त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची मुदत आणखी वाढवली आहे. आता राहिलेले शेतकरी 1 मे 2018 पर्यंत अर्ज करू शकतील.

यापूर्वी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.14 एप्रिल 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे.

वन टाईम सेटेलमेंन्ट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केल्यापासून सारखं त्याबाबत वाद होत आहेत. सुरवातीला यादींच्या घोळामुळं कर्जमाफीस उशीर झाला.

नंतर बँकांनी घोळ घातला. तर विरोधकांनीही सरकारला वारंवार या प्रश्नावर घेरलं होतं. आता कर्जमाफीची मुदत आणखी वाढवून दिल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 05:15 PM IST

ताज्या बातम्या