बँकांनीच कर्जमाफीचा घोळ घातलाय ? आधार लिंक राहणार की जाणार ?

बँकांनीच कर्जमाफीचा घोळ घातलाय ? आधार लिंक राहणार की जाणार ?

मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या योजनेला बँकांनीच सुरूंग लावल्याचं स्पष्ट झालंय. न्यूज 18 नेटवर्कच्या फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये बँकांनी ऐतिहासिक घोळ घातल्याचं समोर येतंय. आधार क्रमांकांना घेऊन तर बँकांनी कहरच केला आहे. अनेक लाभार्थींना एकच आधार क्रमांक अनेकदा दिला गेलाय.

  • Share this:

25 नोव्हेंबर, मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या योजनेला बँकांनीच सुरूंग लावल्याचं स्पष्ट झालंय. न्यूज 18 नेटवर्कच्या  फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये बँकांनी ऐतिहासिक घोळ घातल्याचं समोर येतंय. आधार क्रमांकांना घेऊन तर बँकांनी कहरच केला आहे. अनेक लाभार्थींना एकच आधार क्रमांक अनेकदा दिला गेलाय. त्यामुळे आता आधार कार्डाची सक्ती हटवण्याचा विचार सरकार करचंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. एवढंच नाही, तर या योजनेत खोडा घालण्यामागे भाजपमधलाच एक विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा खासदार आहे, असंही कळतंय. असं जरी असलं, तरी योजनेमध्ये खोडा घालण्यासाठी बँकांनी हा घोळ मुद्दामहून घातलाय का, असा प्रश्न आता पडतोय. या बँकांवर सरकार कारवाई करणार का, ते आता पहावं लागेल.

पाहूयात बँकांनी नेमका कसा घोळ घातलाय ते... 

- 30 टक्के खातेदारांची माहिती सदोष

- 4 लाख खातेदारांच्या माहितीत विसंगती

- पती पत्नीसाठी एकच सेव्हिंग अकाऊंट

- अनेक व्यक्तींचे दिले सारखेच आधार नंबर

- अनेक शेतकऱ्यांचे दिले चुकीचे आधार नंबर

- एकाच आधार नंबरवर अनेकांचे सेव्हिंग अकाऊंट्स

- एकच नाव, एकच आधार नंबर आणि सेव्हिंग खात्यांच्या पुन्हा पुन्हा एन्ट्री

- कर्जदाराच्या कर्जाचा नीट तपशीलच नाही िगी

- अनेक बँकांनी कर्जाची पूर्ण परतफेड केल्याचं सांगत अतिरिक्त रक्कम दाखवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 02:16 PM IST

ताज्या बातम्या